एकदा एका शेतात काही बगळे आणि हंस होते. काही पारध्यांनी ते पाहून त्यांच्यावर अचानक हल्ला केला. तेव्हा बगळे हलके आणि चपळ असल्याने ते तात्काळ उडून गेले. परंतु हंस मात्र जड अंगाचे असल्याने ते वेळेवर उडू शकले नाही व पारध्यांच्या हाती सापडले.
तात्पर्य - जडपणा आणि आळशीपणा आपल्या अंगी कधीही जडू देऊ नये. कारण त्यांच्यामुळे आपले कधी ना कधी तरी फार मोठे नुकसान होते.