मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|नक्षत्र जनन शांती|
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व गोप्रसव शांती

मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व गोप्रसव शांती

मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.
Performing yagna to the birth star will help the people to safeguard the life from worries and bad days.


मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

संकल्प - अस्यां प्रतिमायां देवकला सान्निध्यार्थं प्राणप्रतिष्ठां करिष्ये । ॐ आं र्‍हीं क्रौं ।

अं यं रं लं वं शं षं सं हं क्षं अः । क्रौं र्‍हीं आं हंसः सोऽहम् । अस्या मूर्तौ प्राण इह प्राणाः ।

ॐ आं र्‍हीं क्रौं । अं यं रं लं वं शं षं सं हं क्षं अः । क्रौं र्‍हीं आं हंसः सोऽहम् । अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः ।

ॐ आं र्‍हीं क्रौं । अं यं रं लं वं शं षं सं हं क्षं अः । क्रौं र्‍हीं आं हंसः सोऽहम् ।

अस्यां मूर्तौ सर्वेंद्रियाणि वाङमनस् त्वक् चक्षु श्रोत्र जिव्हा पाणि पाद पायुपस्थानि इह एवागत्य सुखं चिरं तिष्ठंतु स्वाहा ।

गर्भाधानादि पंच दश संस्कारा सिद्ध्यर्थं पंचदश र्‍हीं वृत्तीं करिष्ये ।

यानंतर १५ वेळा ॐ म्हणावे. यानंतर दूर्वेने मूर्तीच्या डोळ्यांना तूप लावावे.

रक्तांभोधिस्तपोतोल्लसदरुन सरोजाधिरूढा कराब्जैः । पाशं कोदंडभिक्षुद्भवमथ गुणमप्यंकुशं पंचबाणान् ।

बिभ्राणासृक्कपालं त्रिनयनलसितापीनवृक्षोरुहाढ्या । देवीं बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परा नः ।

वेळे अभावे किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव वरील मंत्रांनी प्राणप्रतिष्ठा करणे शक्य नसेल तर फक्त खालील मंत्र म्हणून प्राणप्रतिष्ठा करता येईल.

अस्यै प्राणाः प्रतिष्ठंतु अस्यै प्राणाः क्षरंतु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन् ।

प्राणशक्त्यै नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि । हरिद्रां कुंकुमम् सौभाग्य द्रव्यं समर्पयामि । नमस्करोमि ।

यानंतर ही प्रतिमा वास्तुपीठावर ब्रह्माच्या सुपारीच्या उत्तरेस ठेवावी.

गोप्रसव शांती

आचार्य कर्म केल्यानंतर घराच्या ईशान्येस गायीच्या शेणाने जमीन सारवावी. त्यावर पांढर्‍या रांगोळीने २४ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर भात ( साळी ) टाकून त्यावर सूप ठेवावे. त्या सुपात लाल वस्त्र पसरून त्यामध्ये तीळ टाकावेत .

चांदीच्या गायीचे किंवा सुपारीवर गायीचे आवाहन करून पूजन करावे.

श्रीगवये नमः । आवा्हनार्थे अक्षतां समर्पयामि । श्री गवये नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि । हरिद्रां कुंकुमम्‍ समर्पयामि ।

इति पंचोपचारैः संपूज्य । शिशुसमीपे गोमुखमानीय प्रसवं भावयित्वा ।

गायीची पंचोपचाराने पूजा करावी पूर्वेला तोंड व दक्षिणेला पाय होतील असे बालकाला सुपात ठेवावे. (बालक मोठे असल्यास बालकाचे पाय तरी सुपात ठेवावयास सांगावे) सुपासहित बालकाला सुताने गुंडाळून गायीच्या मुखाजवळ न्यावे. बालकाचा पुनर्जन्म गायीच्या मुखातून झाल्याचा भाव मनात आणावा.

त्यावेळी विप्रांनी -

विष्णुं जिष्णुं महाविष्णूं प्रभविष्णुं महेश्वरम्‌ । अनेकरूप दैत्यांतं नमामि पुरुषोत्तमम्‍ ।

हा मंत्र म्हणत बालकावर पंचगव्य शिंपडावे.

गवामंगेषु तिष्ठंति भुवनानि चतुर्दश । यस्मात्तस्माच्छिवं मे स्यादिह लोके परत्र च ॥

या मंत्राने गायीच्या सर्वांगाला किंवा डाव्या अंगाला बालकाचा स्पर्श करावा.

आचार्यांनी खालील मंत्र म्हणत बालकाला घेऊन ते बालक त्याच्या आईकडे द्यावे. आईने ते बालक वडिलांच्या हातात द्यावे. आचार्यांची वडिलांकडील बालक घेऊन पुन्हा आईकडे द्यावे.

विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम्‌ । अनेकरूप दैत्यातं नमामि पुरूषोत्तमम्‍ ।

बाळाचे पूर्वीचे वस्त्र काढून नवीन कपडे घालावेत. वडिलांनी त्याचे मुखकमल पाहावे. आचार्यानी

अपवित्रः पवित्रोवा...शुचिः।

हा मंत्र म्हणत शिशूवर पंचगव्य शिंपडावे. वडिलांनी दोन्ही हातांनी बालकाला धरून त्याची/ तिची टाळू तीन वेळा हुंगावी व श्वास बाजूला सोडावा. ( बालक मुलगा असेल तरच आचार्यांनी खालील मंत्र म्हणावा, मुलगी असेल मंत्र म्हणू नये. कारण मंत्रात पुल्लिंगी उच्चार आहे )

यस्मात्त्वमाधिजातोऽसि हृदाद्यंगात्‍ शिशो मम । तस्मादात्मासि पुत्राख्यो भवा युष्मांञ्छरद् शतम्

यानंतर बालकाला योग्य ठिकाणी ठेऊन पंचवाक्यैः पुण्याहवाचन करावे.

१. यजमानाने म्हणावे -

मह्यं कृत गोमुखप्रसव भावनाख्यस्य कर्मणः पुण्याहं भवंतो ब्रुवंतु । अस्तु पुण्याहं।

२. मह्यं कृत गोमुखप्रसव भावनाख्याय कर्मणे स्वस्तिं भवंतो ब्रुवंतु । आयुष्मते स्वस्ति ।

३. मह्यं कृत गोमुखप्रसव भावनाखयस्य कर्मणः ऋद्धिं भवंतो बुवंतु । कर्मृऋध्यताम्‍ ।

४. मह्यं कृत गोमुखप्रसव भावनाख्यस्य कर्मणः श्रीरस्विति भवंतो ब्रुवंतु । अस्तु श्रीः ।

५. मह्यं कृत गोमुखप्रसव भावनाख्यस्य कर्मणः कल्याणं भवंतो ब्रुवंतु । अस्तु कल्याणं ।

ततः तां गां दरिद्र ब्राम्हणाय विधिना दद्यात्‍ ।

या नंतर वरील गाय विधिपूर्वक दरिद्री ब्राम्हणास दान द्यावी त्याचा विधी असा - संकल्प-

अर्कादि प्रीत्यर्थं गोवस्त्र स्वर्णे धान्यानि यथा शक्ति निष्क्रयद्वारा - प्रत्यक्ष वस्तु रूपेण वा

( प्रत्यक्ष वस्तु देणार असल्यास हे म्हणावे )

दातुं अहं उत्सृज्ये ।

१. गाय देण्याचा मंत्र

गवामंगेषु तिष्ठंति भुवनानि चतुदर्श । यस्मात्तस्माच्छिवं मे स्यादिह लोके परत्र च ।

२ वस्त्र देण्याचा मंत्र -

शरण्यं सर्व लोकानां लज्जाया रक्षणं परम्‍ । सुवेशधारिवस्त्रत्वमतः शांतिं प्रयच्छ मे ।

३. हिरण्य देण्याचा मंत्र - हिरण्य गर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसोः । अनंत पुण्य दमथः शांतिं प्रयच्छ मे ।

४. धान्य देण्याचा मंत्र -

धान्यं करोति दातारमिह लोके परत्र च । तस्मात्प्रदीयते धान्यमतः शांतिं प्रयच्छ मे ।

एतानि गो वस्त्र हिरण्य धान्यादि दानानि निष्क्रय द्वारा दानेन अर्कादि प्रीयंताम् ।

गोप्रसव देवता स्थापन -

पूर्व दिशेस पाटावर तांदळाच्या ढिगावर एक कलश विधिवत्‍ ( सर्वेषामाश्रया भूमिर्वराहेण इत्यादी सर्व मंत्रानी ) स्थापन करावा.

त्यावर एक ताम्हण ठेवावे. त्या ताम्हणात तांदूळ भरून त्यावर मध्यभागी एक सुपारी ठेवून त्यावर विष्णूचे आवाहन करावे.

त्याच्या उत्तरेस एक सुपारी ठेवून त्यावर वरुणाचे आवाहन करावे.

विष्णु - कौमोदकी पद्मशंख चक्रोपेतं चतुर्भुजं । नमामि विष्णुं देवशं कृष्णं गरूडवाहनम् । भो विष्णू इहागच्छ इह तिष्ठ । विष्णवे नमः । विष्णुं आवाहयामि ।

वरूण - पाशहस्तं च वरुणं यादसां पतिमीश्वरम् । आवाहयामि यज्ञेस्मिन् पूजेयं प्रतिगृह्यताम ।

भो वरूण इहागच्छ इह तिष्ठ । वरुणाय नमः । वरूणं आवाहयामि । विष्णु वरुणाभ्यां नमः।

असे म्हणून षोडशोपचारे पूजा करावी त्याच्या उत्तरेस केवल नवग्रह ( फक्त ९ ग्रह ) स्थापन करावेत.

जपाकुसुम संकाशं .... दिवाकरं । सूर्याय नमः। सूर्यं आवाहयामि ।

अशा रीतीने नवग्रहांचे मंत्र म्हणून केवल नवग्रहांची स्थापना करावी व पंचोपचारे पूजा करावी. या नंतर कलशाला दर्भाने स्पर्श करून -

इंद्रः सुरपतिः श्रेष्ठो वज्रहस्तो महाबलः । शतयज्ञाधिपो देवस्तस्मै नित्यं नमो नमः ।

( या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.)

टीप - देवतांच्या स्थापनेसाठी जो मंत्र घेतलेला असतो त्याच मंत्राने हवन केले जाते. परंतु गोप्रसवाच्या हवनाचे वेळी मंत्र वेगळे आहेत. हवन प्रकरणात ते दिलेले आहेत.

मूल नक्षत्र स्थापनम्‍ -

यामध्ये ईशान्येस रांगोळीचे स्वस्तिक काढून त्यावर तांदळाच्या ढिगावर एक कलश ( कुंभ ) विधिवत्‍ ( पुण्याहवाचनात दिलेल्या मंत्रानी ) स्थापना करावा. त्या कलशावर पूर्णपात्र ठेवावे . या कलशाच्या चारी बाजूस चार कलश विधिवत्‍ स्थापन करावेत. त्यांच्यावर पूर्णपात्रे ठेवावीत. पूर्ण पात्रांमध्ये वरुणाची स्थापना करावी व वरुणाचे आवाहन करावे. नंतर पंचोपचारे पूजा करावी.

पाशहस्तं च वरुणं यादसांपतिमीश्वरं । आवाहयामि यज्ञेस्मिन् पूजनार्थं नमामि तं । कलशे वरुणाय नमः। पंचोपचारैः संपूज्य।

मध्य कुंभावरील पूर्णपात्रात सुवर्ण रुद्रप्रतिमेची स्थापना करावी.

मध्य कुंभ -

रूद्रो देवो वृषारुढश्चतुर्बाहुस्त्रिलोचनः । त्रिशूल खट्‍वा वरदा भयपाणिर्नमामि ते । रुद्राय नमः । रुद्रं आवाहयामि ।

षोडशोपचारे पूजा झाल्यावर या कुंभास दर्भाचा स्पर्श करून महिम्नाचे एक आवर्तन त्यानंतर पूर्वेकडील, दक्षिणेकडील, पश्चिमेकडील व उत्तरेकडील कुंभावर वरुणाचे आवाहन करून स्थापना करावी . त्यानंतर पूर्वादिक्रमाने त्या त्या दिशांच्या कलशांना दर्भ लावून त्या त्या (खाली दिलेले) मंत्राचा कमीत कमी १०८, २८ वेळा जप करावा.

पूर्व दिशा - इंद्रः सुरपतिः श्रेष्ठो वज्रहस्तो महाबलः । शतयज्ञाधिपो देवस्तस्मै नित्यं नमो नमः ॥१॥

दक्षिण दिशा - आग्नेय पुरूषो रक्तः सर्व देवमयोऽव्ययः । धूम्रकेतू रजोध्यक्षस्तस्मै नित्यं नमो नमः ॥२॥

पश्चिम दिशा - अग्ने त्वं नः शिवस्त्राता वसुदाता सदा भव । नमस्ते यज्ञपुरुष हुतभुग्घव्यवाहन ॥३॥

उत्तर दिशा - रक्षोहणं सुरवरं पायुं देवर्षिपूजितम् । सायुधं शक्तिसहितं वंदेऽरिष्टनिबर्हणम्॥४॥

( जर ५ कलश नसतील तर २ कलश स्थापन करावेत. एकावर रुद्राचे आवाहन करावे. दुसर्‍या कलशावर वरुणाचे आवाहन करावे. शांतिसूक्त जप करावा. )

या कलशाच्या उत्तरेस सफेद तांदळाच्या २४ पाकळ्यांच्या दलांवर आणखी एक कलश विधिवत्‍ स्थापन करावा. या कलशावर पूर्णपात्र ठेवावे. त्या पूर्णपात्रात वरुण पूजा करावी.

कलशे वरुणाय नमः। पंचोपचारैः संपूज्य ।

त्यानंतर वरुणाची प्रार्थना करावी.

यथा मेरुगिरेः शृंगे देवानामालयः सदा । तथा ब्रम्हादि देवानां गृहे मम स्थिरो भव । देवदानव संवादे मथ्यमाने महोदधौ । उत्पन्नोऽसि तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयम्‍। त्वत्तोये सर्वतीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिताः । त्वयि तिष्टंति भूतानि त्वयि प्राणाः प्रतिष्टिताः ॥ शिवः स्वयं त्वमेवासि विष्णुस्त्वं च प्रजापतिः । आदित्या वसवो रुद्रा विश्वदेवाः सपैतृकाः॥

पूर्णपात्रात वस्त्राचे अष्टदल करून त्यावर सोन्याची, चांदीची अग्न्युत्तारण व प्राणप्रतिष्ठा केलेली निऋति प्रतिमा स्थापना करावी.

निऋतिं पाशहस्तं च सर्वलोकैक पावनम्‍ । नरवाहनमत्युग्रं वंदेहं कालिकाप्रियम्‍ । निऋतये नमः । निऋतिं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ।

निऋति प्र्तिमेच्या दक्षिणेस इंद्र देवता स्थापन करावी.

इंद्रःसुरपतिःश्रिष्ठो वज्र्हस्तो महाबलः। शतयज्ञाधिपो देवस्तस्मै नित्यं नमो नमः॥ इंद्राय नमः। इंद्र आवाहयामि ।

निऋति प्रतिमेच्या उत्तरेस आप देवता स्थापन करावी.

स्त्रीरूपाः पाश कलश हस्ता मकर वाहनाः । श्वेता मौक्तिक भूषाढ्या आपस्ताभ्यो नमो नमः । अदभ्यो नमः । अपः आवाहयामि ।

यानंतर पूर्णपात्रात २४ सुपार्‍या मांडून त्यावर नक्षत्रांचे नाममंत्राने किंवा नक्षत्र देवतांचे नाममंत्राने आवाहन करावे. ( नक्षत्रे किंवा नक्षत्रदेवता या दोन्हीपैकी कोणतेही एक घ्यावे. )

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP