अग्निची पूजा
एकादशांगुल परिमिते देशे गंधाक्षत पुष्पैः प्रागादि प्रागः अग्निं अर्चयेत् । अग्नये जातवेदसे नमः । अग्नये सप्तजिव्हाय नमः । अग्नये हव्यवाहनाय नमः । अग्नयेऽश्वोदराय नमः । अग्नये वैश्वानराय नमः । अग्नये कौमारतेजसे नमः । अग्नये विश्वतो मुखाय नमः ।
अग्नये देव मुखाय नमः । यस्मै कृशानो कृतिने सुलोकं करोषि यष्ट्रे सुखकारकं त्वं । बव्हश्वगोवीरधनैरुपेतं धनं समाप्नोत्यविनश्वरं सः । इति उपस्थाय इध्म आत्मानं च अलंकृत्य हस्तं प्रक्षाल्य । इध्म रज्युं इध्मस्थाने निधाय पाणिन् इध्मं आदाय मूल मध्य अग्रेषु स्त्रुवेण त्रिः अभिघार्य । मूलमध्ययोर्मध्यभागे गृहीत्वा ।
स्थंडिलाच्या ११ बोटांच्या परिमितीत पूर्वेपासून आठ दिशांना गंध, अक्षता, फुले यांनी अग्नीची पूजा करावी. त्यावेळी वरील नावे घ्यावीत. उदा. पूर्वेसाठी
अग्नये जातवेदसे नमः ।
म्हणावे. अग्निला सफेद फुले वहावीत.
त्यानंतर आपल्या कपाळास थोड्या अक्षता लावून घ्याव्यात. हात धुवावेत. इध्म्याच्या समिधांना बांधलेली दोरी सोडून ती त्याच जागी ठेवावी व इध्म्याच्या समिधा हातात घ्याव्यात. त्यांच्या मूल मध्य व अग्र या ठिकाणी तुपाचा अभिघार करावा. त्यानंतर मूल व मध्य यांच्या मध्यभागी समिधा धरून खालील मंत्र म्हणून अग्निवर द्याव्यात.
भो जातवेदस्तव चेदमिध्म आत्मा प्रदीप्तो भव वर्धमानः ।
अस्मान् प्रजाभिः पशुभिः समृद्धान् कुरु त्वमग्ने धनधान्ययुक्तान् । जातवेदसे अग्नये नमो नमः । जातवेदसे अग्नय इदं न मम ।
आघार होम
अग्नीच्या वायव्य कोनापासून आग्नेय कोनापर्यंत तुपाची धार सोडताना मनातल्या मनात
प्रजापतये
म्हणावे व मोठ्याने फक्त
नमः
म्हणावे.
असेच नैऋत्येपासून ईशान्येपर्यंत धार सोडताना करावे. अग्नीच्या उत्तरेस तुपाची एक आहुति -
अग्नये नमः । अग्नय इदं न ममः ।
अग्नीच्या दक्षिणेस तुपाची एक आहुति -
सोमाय नमः । सोमाय इदं न मम ।
वराहुति
दर्वीत ४ पळ्या तूप काढून घ्यावे व खालील मंत्र म्हणून आहुति द्यावी.
अभीप्सितार्थ सिध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः । सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः । गणपतये नमः । गणपतय इदं न मम ।
यजमान संकल्प
यजमानाकडून खालील संकल्प सोडून घ्यावा.
अस्मिन् कर्मणि इमानि उपकल्पितानि हवनीय द्रव्याणि या या यक्ष्यमाण देवतास्ताभ्यस्ताभ्यो मया परित्यक्तानि न मम यथा दैवतमस्तु ।
हवनारंभ
यानंतर अन्वाधाप्रमाणे हवन सुरू करावे. प्रत्येक मंत्रानंतर नमः । म्हणावे. खालील देवतांच्या अन्वाधानात सांगितलेल्या द्रव्याने व आहुतीचे जे प्रमाण घेतले असेल तितक्या संख्येच्या आहुतीने हवन करावे.
गोप्रसवाचे हवन
हवनाचे द्रव्य - दधिमध्वाज्य ( दही मध व तूप एकत्र ) ३२ आहुत्या -
१.
स्त्रीरुपाः पाश कलश हस्ता मकर वाहनाः ।
श्वेता मौक्तिक भूषाढया
भूषाढया आपस्ताभ्यो नमो नमः ।
दधिमध्वाज्य ८ आहुत्या -
२.
विष्णु जिष्णुं महाविष्णुं प्रभाविष्णुं महेश्वरम् ।
अनेकरुपदैत्यांतं नमामि पुरुषोत्तमम् ।
दधिमध्वाज्य ४८ आहुत्या -
३.
भो यक्ष्मघ्न महाभाग देवेंद्र सुरपूजित ।
दुर्योग जन्म संभूतं अरिष्टं हर ते नमः ।
या नंतर केवल नवग्रह - दधिमध्वाज्य १-१ आहुति
१. जपाकुसुम संकाशं
२. दधिशंख तुषाराभं
३. धरणी गर्भ संभूतं
४.प्रियंगु कलिका श्यामं
५. देवानांच ऋषिणांच
६.हिमकुंद मृणालाभं
७. नीलांजन समाभास
८. अर्धकायं महावीर्य
९. पलाशपुष्प संकाशं