ज्येष्ठा नक्षत्र देवता स्थापन
यामध्ये पूर्व दिशेस तांदळाच्या ढिगावर एक नवमव्रणं कलश (कुंभ) विधिवत्
सर्वेषामाश्रय भूमिर्वराहेण...
इत्यादी सर्व मंत्रानी स्थापन करावा. या कलशात पाण्याऐवजी तांदूळ (साळी) भरावेत. या कलशावर पूर्णपात्र ठेवावे. या पूर्णपात्रात अग्न्युत्तारण व प्राणप्रतिष्ठा केलेली
सुवर्णाची इंद्र म्हणून ( इंद्राणीसह ऐरावतावर आरुढ झालेला इंद्र ) स्थापना करावी.
इंद्रः सुरपतिः श्रेष्ठो वज्रहस्तो महाबलः । शतयज्ञाधिपो देवस्तस्मै नित्यं नमो नमः।
भो इंद्र इहागच्छ इह तिष्ठ मम पूजां गृहाण वरदो भव । इंद्राय नमः। इंद्रं आवाहयामि ।
असे इंद्राचे आवाहन करुन षोडशोपचारे पूजा करावी. पूजेच्या वेळी दोन वस्त्रे द्यावीत. यानंतर त्याच पात्रात-
१. अग्नेय नमः। अग्निं आवाहयामि ।
२. यमाय नमः। यमं आवाहयामि ।
३. निऋतये नमः। निऋतिं आवाहयामि ।
४. वरुणाय नमः। वरुणं आवाहयामि ।
५. वायवे नमः। वायुं आवाहयामि ।
६. सोमाय नमः । सोमं आवाहयामि ।
७. ईशानाय नमः। ईशान आवाहयामि ।
अग्न्यादि लोकपाल देवताभ्यो नमः।
असे अग्न्यादि लोकपाल देवतांचे आवाहन करुन षोडशोपचारे पूजा करावी. लाल फुले वाहावीत. करंज्यांचा नैवेद्य द्यावा. या कलशाच्या उत्तर बाजूस पूर्वेपासून सुरू करून चार दिशांना चार कलश विधिवत् स्थापन करावेत. त्यामध्ये पंचगव्य, पंचामृत, पंचमृत्तिका, पंच त्वक् (पाच झाडांच्या साली) पंचपल्लव ( पाच झाडांची पाने), सुवर्ण,कुश, दूर्वा, शतौषधी-शतौषधी अभावे शतावरी घालावे. मध्य भागी शतछिद्र
( शंभर छिद्रे असलेला ) कलश स्थापन करावा. हे कलश वस्त्रयुग्माने (दोन वस्त्रांनी) वेष्ठित करावेत. या सर्व कलशांवर पूर्णपात्रे ठेवावीत व वरुणाचे आवाहन करावे.
वरुणाय नमः
असे म्हणून सर्व कलशांवरील वरुणांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यावेळी वस्त्रद्वय अर्पण करावे. पूर्वादि सर्व कलशांची-
कलशस्य मुखे विष्णु... देवदानव संवादे मथ्यमाने महोदधौ । उत्पन्नोऽसि तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयम् ।
त्वत्तोये सर्वतीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिता। त्वयि तिष्टंति भूतानि त्वयि प्राणाः प्रतिष्टिताः ॥
शिवः स्वयं त्वमेवासि विष्णुस्त्वं च प्रजापतिः । आदित्या वसवो रुद्रा विश्वेदेवाः सपैतृकाः ॥
इत्यादी मंत्रानी प्रार्थना करावी. या नंतर या कलशांना दर्भाचा स्पर्श करुन -
रुद्रो देवो वृषारुढ्श्चतुर्बाहुस्त्रिलोचनः । त्रिशूल खटवा वरदा भयपाणिर्नमामि ते ।
या मंत्राचा १०८ वेळा किंवा २८ वेळा जप करावा. वरील मुख्य देवता स्थापन झाल्यावर सर्व आवाहित देवतांची षोडशोपचारे पूजा करावी या नंतर स्थंडिलामध्ये अग्नीची स्थापना करावी व त्यानंतर नवग्रहाची स्थापना करावी.