मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
वैराग्य अभिमानें फिरविलें...

संत जनाबाई - वैराग्य अभिमानें फिरविलें...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


वैराग्य अभिमानें फिरविलें जातें । ह्मणवोनी यातें भाव खुंटा ॥१॥

संचित मातृका वैरणी घातली । अव्यक्तिं दळिलीं व्यक्ताव्यक्त ॥२॥

नामरुपा आदि दळियेलें सर्व । पीठ भरी देव पंढरीचा ॥३॥

नवल हा देव बैसला दळणीं । नाहीं केली जनी नामयाची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP