मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
ब्रम्हा वंदी ज्याचे पाय ।...

संत जनाबाई - ब्रम्हा वंदी ज्याचे पाय ।...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


ब्रम्हा वंदी ज्याचे पाय । त्याची यशोदा ते माय ॥१॥

साम राज्याचा जो दानी । मागे यशोदेसी लोणी ॥२॥

क्षीरसागर ज्याचे चरणीं । त्याला पायावरतें न्हाणी ॥३॥

देव ब्रम्हांड पालकीं । त्याची टाळू हातें माखी ॥४॥

शुक सनकादिक योगी । जनी म्हणे दळूं लागी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP