मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
धन्य धन्य ज्याचे चरणीं गं...

संत जनाबाई - धन्य धन्य ज्याचे चरणीं गं...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला । मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥

धुंडितां ते पाय शिणला तो ब्रह्मा । बोल ठेवी कर्मा आपुलीया ॥२॥

शुक सनकादिक फिरती हरिजन । नारदादि गाणें जयासाठीं ॥३॥

ते चरण आह्मांसी गवसले अनायासी । धन्य झाली दासी जनी म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP