वेधियेलें मन विसरलें देह । पतिसुतगेह धन वित्त ॥१॥
नाठवेचि भोग नाना उपचार । पडला विसर वासनेचा ॥२॥
चिंता भय लज्जा निमालें हें दुःख । वोसंडलें सुख ब्रम्हानंद ॥३॥
विसरलें मान पीडा करी जन । दिसे नारायण विश्वा माजी ॥४॥
तुका म्हणे देह दिला पंढरीशा । तेव्हां ऐसी दशा अंगा आली ॥५॥