ऐसें आणिक कोठें सांगा । पांडुरंगासारिखें ।
दैवत ये भुमंडळीं । उद्धार कळीं पाववितें ॥१॥
कोठें कांहीं कोठें कांहीं । सोव ठाईं स्थळांसी ॥
अन्यत्रीचें तीर्थीं नासे । तीर्थीं असे वज्रलेप ॥
पांडुरंगींचें पांडुरंगीं । पाप अंगीं राहेना ॥२॥
ऐसी हरें गिरिजेप्रती । गुह्य स्थिति सांगितली ॥
तुका म्हणे तीर्थक्षेत्र । सर्वत्र तें दैवत ॥३॥