आतां माझे हातीं देईं माझे हित । करीं माझें चित्त समाधान ॥१॥
तुजपाशीं किती देऊं परिहार । जाणसी अंतर सर्व माझें ॥२॥
शरण आला तरी कापूं नये मान । बाळा मायेवीण कोण दुजें ॥३॥
समर्थाचें बाळ कोडिसवाणें दिसे । देखोनियां हांसे जन कोणा ॥४॥
जरी झालें अवगुणी अमंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥५॥
तुका म्हणे तैंसा मी एक पतित । परी मुद्रांकित दास तुझा ॥६॥