गाइन तुझें नाम ध्याइन तुझें नाम । आणिक न करीं काम जिव्हा मुखें ॥१॥
पाहेन तुझे पाय ठेविन तेथें डोय । पृथक तें काय न करीं आणि ॥२॥
तुझेचि गुणवाद आइकेन कानीं । आणिकांची वाणी पुरे आतां ॥३॥
करीन करीं सेवा चालेन पायीं । आणिक नवजें ठायीं तुजवीण ॥४॥
तुका म्हणे जीव ठेविला तुझे पायीं । आणिक तो काई देऊं कवणा ॥५॥