असो वाट पाहें कांहीं निरोप कां मूळ । कां हे कळवळ तुज उमटेच ना ॥१॥
अवो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लाउनियां आसे चाळवुनी ठेविलें ॥२॥
काय जन्मा येउनियां केली म्या जोडी । ऐसे घडीघडी जीवा येतें आठवूं ॥३॥
तुका म्हणें खरा पावेंच ना विभाग । धिःकारितें जग हेंचि लाहें हिसोबें ॥४॥