मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय पाचवा|
श्लोक ५ वा

एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


विप्रो राजन्यवैश्यौ वा हरेः प्राप्ताः पदान्तिकम् ।

श्रौतेन जन्मनाऽथापि मुह्यन्त्याम्नायवादिनः ॥५॥

अज्ञान जे नीच वर्ण । भावें धरोनि संतचरण ।

निजविश्र्वासें संपूर्ण । जन्ममरण निरसिती ॥७७॥;

येर द्विजन्मे जे कां तिन्ही । स्वभावें प्राप्त हरिचरणीं ।

आम्ही अधिकारी वेदज्ञानी । जन्माभिमानी अतिगर्वी ॥७८॥

जन्माभिमान कर्माभिमान । अग्रपूज्यत्वें पूज्याभिमान ।

अल्पमात्र वेदींचें ज्ञान । तो वेदाभिमान वाढविती ॥७९॥

ज्यासी प्राप्त उपनयन । ज्यासी प्राप्त गायत्री पूर्ण ।

ज्यासी हरीचें आवडे भजन । त्याचे धरितां चरण हरि भेटे ॥८०॥

ऐसे उत्तम जे ब्राह्मण । त्यांसी वेदवादें ज्ञानाभिमान ।

तेणें गर्वें पडे मोहन । तेंचि निरूपण विशद सांगे ॥८१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP