तं तदा मनुजा देवं, सर्वदेवमयं हरिं ।
यजन्ति विद्यया त्रय्या, धर्मिष्ठा ब्रह्मवादिनः ॥२५॥
तैंचे जे मनुष्य जाण । त्रिवेदीं करिती भजन ।
सर्वदेवस्वरूप हरि पूर्ण । यापरी यजन त्रेतायुगीं ॥२७॥
त्रेतायुगीं सर्वही नर । वेदोक्तीं नित्य सादर ।
सर्वही भजनतत्पर । धर्मिष्ठ समग्र अतिधार्मिक ॥२८॥
ते धर्मिष्ठ धार्मिक जन । अष्टधा नामीं नामस्मरण ।
गजरें करिती सदा पठण । तें नामाभिधान ऐक राया ॥२९॥