एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


स्वर्गिणोऽप्येतमिच्छंति, लोकं निरयिणस्तथा ।

साधकं ज्ञानभक्तिम्यामुभयं तदसाधकम् ॥१२॥

ज्यांसी स्वर्गभोगाची अति गोडी । जिंहीं अमरत्वाची उभविली गुढी ।

जे पडले स्वर्गाचे बांदवडीं । ते वांछिती आवडीं नरदेहातें ॥२५॥

नरकयातना महाघोर । जिंहीं भोगिला भोग थोर ।

ते मनुष्यदेहातें नर । अतिसादर वांछिती ॥२६॥

नरदेह परम पावन । जो भक्तिज्ञानाचें आयतन ।

जेणें साधे ब्रह्मज्ञान । तो धन्य धन्य नरदेह ॥२७॥

जेणें नरदेहें जाण । निःशेष खुंटे जन्ममरण ।

जेणें जीव पावे समाधान । स्वानंदघन स्वयें होय ॥२८॥

ज्या नरदेहाचे संगतीं । होय अविद्येची निवृत्ती ।

लाभे भगवत्पदप्राप्ती । हे विख्यात ख्याती नरदेहीं ॥२९॥

ज्या नरदेहाची प्राप्ती । प्राणिमात्र वांछिती ।

प्राणी बापुडे ते किती । स्वयें प्रजापती नरदेह वांछी ॥१३०॥

ऐसें नरदेहाचें श्रेष्ठपण । येथ साधे भक्तिविज्ञान ।

परी भक्तिज्ञानास्तव जाण । मनुष्यपण साधेना ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP