एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः ।

क्षीयन्ते चास्य कर्माणि, मयि दृष्टेऽखिलात्मनि ॥३०॥

उद्धवा मी ज्यासी हृदयीं भेटें । तो मी हृदयामाजीं न संठें ।

सर्वात्मा सर्वरुपें प्रकटें । नव्हे धाकुटें स्वरुप माझें ॥७४॥

ऐसा मी प्रकटलियापाठीं । संसारुचि न पडे दिठीं ।

मावळे गुणेंसीं भेदत्रिपुटी । पळे उठाउठी भवभय ॥७५॥

लागतां सुर्याचे किरण । घृताचें नासे कठिणपण ।

तेवीं मी प्रकटल्या नारायण । न फोडितां जाण लिंगदेह नाशे ॥७६॥

धुई दाटली चहुंकडे । ते चंडवातें तत्काळ उडे ।

तेवीं माझ्या स्वप्रकाशापुढें । वासनेचें उपडे समूळ जाळ ॥७७॥

समूळ उपडितां वासनेसी । संशय निमे जीवेंभावेंसीं ।

तेथ क्षयो झाला कर्मासी । जेवीं रवीपाशीं आंधारें ॥७८॥

तेवीं गुण नासती स्वकार्येंसीं । अविद्या नासे अज्ञानेंसीं ।

जीव नासे शिवपणेंसीं । चिदचिद्‌ग्रंथीसीं अहंकारु ॥७९॥

तेथ सोहंहंसाची बोळवण । न करितांचि जाहली जाण ।

भेणें पळालें जन्ममरण । पडलें शून्य संसारा ॥३८०॥

यापरी भक्तियोगें गहन । माझें करुनियां भजन ।

भक्त पावले समाधान । ऐसेनि जाण निजभजनें ॥८१॥

एवं भक्ति-ज्ञान-कर्मयोग । या तिहीं योगांचा विभाग ।

तुज म्यां सांगितला साङग । हें वर्म चांग मत्प्राप्तीं ॥८२॥

येथ विशेषें माझी भक्ती । न पाहे साह्य सांगाती ।

नव्हे आणिकांची पंगिस्ती । साधी मत्प्राप्ती अंगोवांगीं ॥८३॥

न करितां माझें भजन । सर्वथा नुपजे माझें ज्ञान ।

कर्म न करितां मदर्पण । तेंचि जाण अकर्म ॥८४॥

यालागीं मुख्य जें निजज्ञान । तें अपेक्षी माझें भजन ।

तेथ कर्म बापुडें रंक जाण । भजनेंवीण सरेना ॥८५॥

एवं ज्ञान कर्में परमार्थी । माझे भक्तीस्तव होती सरतीं ।

ते भक्तीची निजख्याती निजख्याती । ऐक तुजप्रती सांगेन ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP