एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


नैरपेक्ष्यं परं प्राहुर्निःश्रेयसमनल्पकम् ।

तस्मान्निराशिषो भक्तिर्निरपेक्षस्य मे भवेत् ॥३५॥

जो निरपेक्ष निर्विशेष । तो मज पूज्य महापुरुष ।

मोक्ष त्याचे दृष्टीं भूस । धन्य नैराश्य तिहीं लोकीं ॥११॥

ऐक निरपेक्षतेचा उत्कृष्ट । तेथ चारी पुरुषार्थ फळकट ।

वैकुंठकैलासादि श्रेष्ठ । ते पायवाट निरपेक्षा ॥१२॥

निरपेक्षापाशीं जाण । वोळंगे येती सुरगण ।

तेथ ऋद्धिसिद्धींचा पाड कोण । वोळंगे अंगण कळिकाळ ॥१३॥

स्वयें महादेव आपण । सर्वस्वें करी निंबलोण ।

श्रियेसहित मी आपण । अंकित जाण तयाचा ॥१४॥

निरपेक्ष जो माझा भक्त । तो मजसमान समर्थ ।

हेंही बोलणें अहाच येथ । तो मीचि निश्चित चिद्रूपें ॥१५॥

मी परमात्मा परमानंद । भक्त मद्भजनें शुद्ध स्वानंद ।

दोघे अभेदें स्वानंदकंद । सच्चिदानंद निजरुपें ॥१६॥

ऐसे मद्भावें भक्त संपन्न । ते न देखती दोषगुण ।

तेचिविखींचें निरुपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP