ग्रहपरत्वें आयुष्यवर्षे
अर्थ -- मय, यवन, मणित्य, पराशर इत्यादि आचार्यानी मरमोच्चस्थ ग्रहपरत्वें आयुष्याची वर्षे अशी सांगिंतली आहेत -- सूर्य १९, चंद्र २५, मंगळ १५, बुध १२, गुरु १५, शुक्र २१ आणि शनि २० एकूण वर्षे १२७.
आयुष्याची वजाबाकी ( मंदाक्राता )
अर्थ -- ग्रह परमनीचस्थ असतां त्या ग्रहाचें आयुर्वर्षातुन निम्मी वर्षे आयुष्यांत कमी पडतात. म्हणून ग्रह आपल्या परमोच्च बिंदूपासून जितक्या अंशांनी ( राशि, अंश, कला वगैरे ) दूर असेल ( मागे किंवा पुढें असा ) तेवढ्या अंशाच्या हिशेबानें आयुष्यांत कमी पडणारी वर्षे वजा करावी, म्हणजे ३६० अंशास जर चन्द्राची २५ वर्षे तर अमुक अंश अंतरास किती ? अशा हिशेबानें उत्तर आणून तें ज्याचे त्याच्या परमायुष्यवर्षातुन वजा करावें म्हणजे उरलेंल्या आयुष्याची बेरीज त्या प्राण्याचे आयुष्य होते.
आतां लग्नाची वर्षे काडावयाची ती उदयास आलेल्या नवांशा इतकी ( महिनें, विसस वगैरे सुद्धां हिशेबानें ) घ्यावी. लग्नाच्या राशीच्या क्रमांकाइतकी घ्यावी असेंहि कित्येकाचें मत आहे. मंगळाशिवाय दुसरा ग्रह शत्रुगृही असतां त्याचे गणितांगंत वर्षाचा एक तृतीयांश त्यांतूनच आणखी कमी करावा. शनिं व शुक्र या व्यतिरिक्त ग्रह अस्तंगत असतां त्याचे अवशिष्ट हिशेबी वर्षाचा एक तृतीयांश आयुष्यांतून आणखी वजा करावा.
आयुष्याची वजाबाकी ( प्रहर्षिणी )
अर्थ -- पापग्रह व्यवस्थानापासून उलट क्रमानें सप्तम स्थानापर्यत कोठेंही असतील तर खालीं दिल्याप्रमाणे आपआपल्या आयुष्याचा भाग गाळतात,
व्यय -- सर्वभाग, एकादश -- अर्धभाग, दशम -- तिसरा भाग, नवम -- चवथा भाग, अष्टम - पांचवा भाग आणि सप्तम - सहावा भाग.
परंतु पापग्रहांच्या ऐवजी याच स्थानी शुभग्रह असतील तर, त्याच अपनी पापग्रह आपल्या आयुष्याचा जेवढा भाग हरतात त्याचा अर्धा भाग मात्र शुभ ग्रह आपल्या आयुष्यातून हरतात.
या स्थानांतून एकाच स्थानी अनेक ग्रह असतीत तर, त्यांत जो अधिक वीर्यवान असेल, तेवढा ग्रह मात्र आपल्या आयुष्याचा पूर्वोक्त भाग हरतो; सगळेंच काही हरत नाहींत. सत्याचार्यानी सुद्धां असेच सांगितले आहे.
लग्नीं ग्रह असल्यास विधी
अर्थ -- जन्मलग्नी कोणी शुभाशुभ ग्रह असेल तर पूर्वोक्त पद्धतीनें जो आयुदीय सिद्ध झाला असेल त्यांतून --
लग्नी भुक्त झालेल्या नवांशाइतका - अष्ठोत्तरशततमांश ( १०८ वा भाग ) क्रूरग्रहपक्षी किंवा षोडशोत्तरद्विशततमांश ( २१६ वा भाग ) शुभग्रहपक्षी कमी करावा.
चालू नवांशाचा जेवढा अंश भुक्त झाला असेल त्यासहित गत झालेल्या पूर्व नवांशाइतक्या, नवाशाच्या संख्येनें आयुर्दायास गुणून लग्नीं शुभग्रह असेल तर २१६ नी व पापग्रह ( शनि, मंगळ, सूर्य यांत राहू केतू हें ग्रह घेऊं नयेत ) असेल तर १०८ नी भागून फल -- वर्षे, महिनें, दिवस -- इत्यादि येईल तें आयुर्दायांतून कमी करावें.
आयुष्याची परमावधि ( शिखरिणी )
अर्थ - एकशेवीस वर्षे व पांच अहोरात्र इतके मनुष्य व हत्ती यांचे, बत्तीस वर्षे घोड्याचे, पंचवीस वर्षे उंट व गाढव यांचे, चोवीस वर्षे गाई व म्हैस यांचे, बारा वर्षे कुत्र्याचे व सोळा वर्षे शेळ्या मेंढ्यांचे परमायुष्य जाणावें.
मनुष्येत्तरांचे आयुष्य मनुष्याप्रमाणेंच प्रथम सिद्ध करावें. नंतर त्यास ज्याचे त्याचे परमायुष्याच्या वर्षानी गुणून मनुष्याच्या परमायुष्य ( १२० ) वर्षानीं भागावे म्हणजे इतर प्राण्यांचे आयुष्य सिद्ध होते,
परमायुष्ययोग
अर्थ -- मीन राशीच्या वर्गोत्तम नवांशी लग्न असतां, बुध, वृषभ राशीस पंचवीस कलांवर असून अवशिष्ट ग्रह आपआपल्या उच्च राशीच्या परमोच्च भागी असतील तर त्या वेळी उपजलेल्या प्राण्यांत परिपूर्ण आयुष्य प्राप्त होते.
बुध व सूर्य हे ग्रह एकदय आपआपल्या उच्चराशीस येऊं शकणार नाहीत; कारण बुधाची कक्षा पृथ्वीचे कक्षेपेक्षां फार लहान आहे. म्हणून सूर्य मेष राशीस १० अंश असेल तेव्हां बुध आपल्या या परमोच्चस्थानापासून ( ५ - १५ - ० - ० ) फार दूर -- म्हणजे सूर्याचे आसपासच असणार म्हणून मनुष्यास ( अध्याय ७ श्लोक १ यांत सांगितल्याप्रमाणे ) १२७ वर्षे आयुष्य असूं शकत नाहीं. केवळ बुधाच्याच संबंधानें म्हटलें तर तो कन्या राशीस १५ अंश असला तरच आपले परमायुष्य देईल. तसें तो वृषभास असतां देणार नाहीं.
ग्रंथकाराचा अभिप्राय ( शालिनी )
अर्थ -- मायादिकांनी जशी आयुर्दायाची पद्धति सांगितली, त्याप्रमाणेंच विष्णुगुप्त देवस्वामी, सिद्धसेन यांनीहि सांगितली आहे. परंतु त्यांच्या सांगण्यामध्ये हा एक दोष आढळतो, की त्यांनी जन्मापासून प्रथमचीं आठ वर्षे अरिष्टांत धरिलो, ती वजा जातां बाकीच्या वर्षापैकी कितीही दुर्योग असले तरी निदान वीस वर्षे तरी कायम शिल्लक राहतात. त्यावरुन मनुष्याची प्रथमची आठ वर्षे निभावलीं की, मग त्यास पुढें निदान वीस वर्षेपर्यंत अगदी मृत्यु असूं नये; पण त्या अवधीत सुद्धां मनुष्ये मरतात, म्हणूनच त्याची आयुर्दायाची पद्धत ठीक नाही.
दोषाचें कारण
अर्थ -- कित्येकांनी ज्या योगावर पूर्णायुष्य लाभते म्हणून म्हटलें आहे, त्याच योगवर चक्रवर्ति राज्याचा लाभ सांगितला आहे. पण कित्येक लोक दरिद्री ते देखील पूर्णायुषी असूं शकतात. तेव्हां पूर्णायुषास जे योग कारण होतात तेच योग राज्यलाभास कारण होतात असे म्हणण्यांत त्यांचा मोठा दोष आहे.
जीवशर्मा व सत्याचार्य
अर्थ -- जीवशर्मा यानें सूर्याची १९, चंद्राची २५ इत्यादि प्रकार सोडून प्रत्येक ग्रहाच्या सुयोगी सरसकट परमायुष्याचा सप्तमांशच धरीत जावा असे स्वमत सांगितले आहे; परंतु सत्याचार्याचे हें मत बहुमान्य आहे ते आहे --
ग्रहाचा मेषवृषभादि जो नवांश तितका युक्त झाला असेल, तत्संख्य वर्षे -- ज्या त्या प्रत्येक ग्रहाबद्दल सूक्ष्म गणित करुन जमेत घ्यावी. हें मत मात्र निर्दोष जाणावें.
सत्याचार्यमतानें कर्यव्य ( आर्या )
अर्थ -- सत्याचार्याच्या मतानें आयुर्दाय आणावयाचा असतां राश्यादिक स्पष्ट ग्रहाच्या एकंदर कला करुन त्यास दोनशे ( २०० ) या संख्येनें भागून ( भागाकार ) जी वर्षे येतील ती बारांनीं तष्ट करुन ज्या त्या ग्रहाबद्दल घ्यावी.
वरील वर्षापुढचें मासादिक फल पद्धतीप्रमाणे शेष उरेल त्यावरुन गणितानें जाणावें.
अर्थ -- ग्रह स्वोच्चस्थ किंवा वक्र असल्यास त्याचे आयुष्य वर्षाची तिप्पट करावी आणि स्वराशिस्थ, स्वनवांस्य, वर्गीतमस्य किंवा स्वद्रेष्काणी अखतां दुप्पट करावी. एवढाच भदत्त ( सत्याचार्य ) यांचे सांगण्यांत विशेष आहे. दुर्योगावरुन वर्षे आयुर्दायांत वजा करावयाची तो प्रकार पूर्वी सांगितला आहे.
सुयोगी कर्तव्य
अर्थ -- सत्याचार्य यांचें मताने ग्रह आपल्या स्वराशीस किंवा वर्गोत्तमनवमांशी किंवा स्बनवमांशी किंवा स्वद्रेष्काणी असतां, आलेल्या आयुदीय वर्षाची दुप्पट करावी आणी स्वोच्चराशीस किंवा वक्र असतां तिप्पट करावी. इतके विशेष आहे. बाकीचे कर्तव्य ते बर सांगितलें आहे. म्हणजे श्लोक २-३ यांत सांगितल्याप्रमाणे करावें.
लग्नावरुन आयुष्य घेणें
अर्थ -- लग्नाची वर्षे भुक्त नवांशराशीच्या अंकांइतकी सूक्ष्म गणितानें घ्यावी. लग्न बलिष्ट असल्यास तद्राशिसंस्थांक वर्षे पुन्हा जास्त घ्यावी.
याप्रकारें आयुदीय साधीतव्य असेल तेव्हा या अध्यायाचा १,२ व ४ चौथ्या श्लोकांत सांगितलेला प्रकार तेथें उद्देशू नये.
सत्याचार्याच्या मताचें मंडण
अर्थ -- सत्याचार्यानी सांगितलेला आयुर्दाय वर सांगितलेल्या अन्य प्रकाराहून उत्तम आहे; कारण अन्य आचार्य तर ग्रह जितके बलांनी युक्त असेल, तितके वेळां दुप्पट किंवा तिप्पट करण्यास सांगतात, ( ते अयोग्य आहे ) परंतु सत्याचार्य तर त्या ठिकाणीं एकच वेळ दुप्पट किंवा तिप्पट करण्यास सांगतात, तसेच करावें ( श्लोक ११ प्रमाणें )
दीर्घायुष्ययोग
अर्थ -- वर सांगितलेल्या आयुर्दायाचे अनुक्रमाहुत ही ' अपरिमित आयुष्य ' ह्या योगावर जन्म झाला असतां होते, तो योग -- गुरु -- चंद्र हें कर्क राशीत लग्नी प्राप्त असावेत व बुध - शुक्र, केंन्द्रावर असावेत आणि बाकीचे ग्रह एकादश, षष्ठ, तृत्तीय या स्थानी असावेत, म्हणजे तो ' अपरिमितायुष्य योग ' होतो, वरील क्रमाशिवाय.