( आकाशांतील वेगवेगळ्या भागांमध्ये ग्रहांचे योग )
नाभसयोगांची संख्या
अर्थ -- नवांची तिप्पट २७ दहांची तिप्पट ३० व आठांची चौपट ३२ हें भेद ७ व २० हें दोन मिळून २७ व यांत ३ मिळून ३० व यांत २ मिळून एकंदर ३२ योग होतात ( संख्यायोग ७, आकृतियोग २०, आश्रययोग ३ दलयोग २ मिळून ३२ योग आहेत. ) यवनाचार्य यांनीं तर सहाशे या संख्येची तिप्पट १८०० इतके प्रकारचे योग विस्तारानें सांगितलें आहेत. एथें तर त्यांचा संक्षेप केला आहे, ( ते सर्व ह्या ३२ सांत येतात. )
आश्रमयोग व बलयोग
अर्थ -- चर राशीवर सर्व ग्रह आलें असतां तो ' रज्जु ' योग होतो. स्थिर राशीवर सर्व ग्रह आले असता तो ' मुशल ' योग होतो. द्विस्वभाव राशीपर सर्व ग्रह आले असतां तो ' नल ' योग होतो. हे तीन ' आश्रययोग ' सत्याचार्य यांनी सांगितलेले आहेत. केन्द्री सर्व शुभग्रह असले तर तो ' स्रक् ( माला ) योग ' होतो. केंन्द्री सर्व पापग्रह असले तर तो ' सर्वयोग ' होतो, या प्रकारे हे दोन ' दलयोग ' पराशरांनीं सांगितलें आहेत.
कांहीं नाभसयोग व सांगण्याच हेतु
अर्थ -- यव, अब्ज, वज्र, अंडज, गोलक इत्यादिक योग आश्रययोगासारिखेच आहेत व केन्द्री असणारे ग्रहांचेहि योग वर सांगितलेलें दलयोगाचे फळाप्रमाणे अन्य आचार्यानीं सांगितलेलें आहेत. यास्तव हे एथे पृथक् सांगितलेलें नाहींत.
आकृतियोग ( वसंततिलका )
अर्थ -- सन्निध असणार्या दोन केन्द्रावर सर्व ग्रह असतील तर तो ' गदाख्य योग ' होतो -- लग्न, सप्तम या दोन केन्द्रांवरच सर्व असणारे ग्रहांच ' शकट योग ' होता -- दशम, चतुर्यस्थ असणारे ग्रहांचा ' विहंग ' योग होतो -- लग्न, नब, पंचम या स्थानीं सर्व ग्रह असले तर तो ' शृंगाटक ' योग होतो -- व लग्नावाचून अन्यस्थानीं असा ग्रहयोग असतां तो ' हल ' योग होतो. असें होराशास्त्राज्ञात्याहि सांगितलेलें आहे.
आकृतियोग पुढें चालू ( वैतालिका )
अर्थ -- चारही केन्द्रावर शकटाप्रमाणे शुभ व विहंगाप्रमाणे अशुभ म्हणजे लग्न, सप्तम या केन्द्रावर पाप असे ग्रह असतील तर तो ' वज्र ' योग होतो -- व याहून उलट क्रमानें म्हणजे लग्न, सप्तम या केन्द्री पापग्रह, चतुर्थ दशम या केन्द्री शुभ ग्रह असतां तो ' यव ' योग होतो -- व तेच शुभ व पापग्रह चारही केन्द्रावर मिश्र असतां ' कमल ' योग होतो. -- केन्द्राशिवाय पणफर आपोक्लिमस्थ असे ग्रह असलें तर तो ' कपी ' योग होतो.
आकृतियोग पुढ़े चालू ( अनुष्टुप )
अर्थ - पूर्वशास्त्रांच्या आधारानें हे मी ( वराहमिहिर ) वज्रादिक योग केले आहेत. परंतु बुध, शुक्र हे सूर्यापासून चतुर्थस्थानीं कसें होतील ?
आकृतियोग पुढें चालू
अर्थ -- केन्द्रापासून चार स्थानांमध्ये सर्व ग्रह असलें तर हें योग होतात लग्न, द्वितीय, तृतीय, चतुर्थ या स्थानी असतां ' शर ' -- सप्तमापासून दशमापर्यंत ' शक्ति ' -- दशमापासून लग्नापर्यत ' दंड ' असे योग होतात.
आकृतियोग पुढें चालू
अर्थ -- वरप्रमाणेंच केंद्रापासून सात स्थानीं सर्व ग्रह असतां हे योग होतात. लग्न, द्विती य इत्यादि पुढें सप्तम स्थानापर्यत ग्रह असतां तो ' नौका ' योग. -- चतुर्थ, पंचम इत्यादि दशमापर्यतचा ' कूट ' योग -- सप्तम, अष्टम इत्यादि लग्नापर्यतचा ' छत्र ' योग -- दशम, एकादश इत्यादि चतुर्थ स्थानापर्यतचा ' चाप ' योग -- वरचे योगाशिवाय अशा सात स्थानी क्रमानें ग्रह असतां तो ' अर्धचन्द्र ' योग होतो. ( द्वादश स्थानांतून चार केन्द्रेरहित यास्तव याचे आठ प्रकार आहेत. )
आकृतियोग पुढें चालू
अर्थ -- द्वितीय स्थानापासून एकांतर स्थानीं ( २ -४ - ६ - ८ - १० -१२ ) सहा स्थानीं सर्व ग्रह असतां तो ' समुद्र ' योग होतो -- तोच लग्नापासून एकांतरस्थ ( १ - ३ - ५ - ७- ११ ) असतां ' चक्र ' योग होतो -- या प्रकारे ' आकृतियोगांचा संग्रह ' केला आहे.
संख्यायोग ( शालिनी )
अर्थ -- संख्यायोग असे होतात -- सातही ग्रह एकामागून एक असे सात स्थानीं असतील तर तो ' वल्लकी ' योग होतो -- तेच सातहि ग्रह साहा स्थानीं एकामागून एक असतील तर तो ' दामिनी ' योग होतो -- तेच पाच स्थानी असे असतां तो ' पाश ' योग -- चार स्थानी असतां ' केदार ' -- तीन स्थानीं असतां ' शूल ' -- दोन स्थानी असतां ' युग ' -- एकच स्थानीं असतां ' गोल ' -- या प्रकारे वर सांगितलेल्या योगास बाध येत नसेल, तर हें योग होतात असे जाणावें.
आश्रवयोग व दलयोग यांची फळें ( वसंततिलका )
अर्थ -- रज्युयोगाचे फळ -- मत्सरी, विदेशवासी, भ्रमणशील; मुशलयोगाचे फळ -- मानशील, धनवान, अनेक कार्यासक्त; नलयोगाचे फळ -- अंग -- हीन, स्थिर, धनाढ्य, निपुण; स्रकयोगाचे फळ -- भोगवान; सर्पयोगाचें फळ -- अनेक प्रकारची दुःखें भोगणारा.
विशेंष नियम ( अनुष्टुप )
अर्थ -- अन्य योगांनी ( यवादिक ) मिश्र असतां हे आश्रययोग निष्फळ होऊन, जे मिश्र झालें असतील, त्यांची फळें होतात आणि हें योग अमिश्र असतां मात्र स्वफल देतात. असे जाणावें.
आकृतियोग व संख्यायोग यांची फळें
अर्थ -- गदायोगाचें फळ -- यजनकर्ता, धनवान, सर्वदा द्रव्योपार्जनप्रीति, शकटयोगाचे फळ -- शकटोपजीवी, सदारोगी, दुष्टस्त्री; विहंगयोगाचें फळ -- दूत, भ्रमणशील, कलही; शृंगाष्टक योगाचें फळ -- अन्त्य वयांत सुखी; हलयोगाचे फल -- कृषिकर्मकर्ता ( शेती )
अर्थ -- वज्रयोगाचें फळ -- बाल्य आणि वृद्धपण यामध्ये सुखी, स्वरुपवान, अतिशूर; यवयोगाचें फळ -- पराक्रमी, मध्यवयात सुखी, पद्मयोगाचे फल -- कीर्तिमान, अपरिमित सौख्य व गुणेंकरुन युक्त; वापीयोगाचे फळ -- सर्वकाळ अल्पसौख्य, गुप्तघन ( ठेवा ) ठेवणारा, कृपण ( कदू )
अर्थ -- यूप योगाचें फळ -- त्यागी ( दाता ), आत्मवान ( अवधानी ), मोठालें यज्ञ करणारा; शर योगाचें फळ -- हिंसक, कारागृहाधिकारी ( जेलर ), बाण करणारा; शक्ति योगाचे फल -- नीच, आळशी, असुखी, निर्धन; दंड योगाचे फळ -- प्रियवनहीन, नीचवृत्ति.
अर्थ -- नौका योगाचे फळ -- कीर्तिमान, अस्थिरसुख, कृपण; कूट योगाचे फळ -- असत्यभाषणी, बंधन पावणारा; छत्र योगाचे फल -- शूर, प्रथम व अंत्य वयामध्ये सुखी.
अर्थ -- अर्धचन्द्र योगाचें फल -- सौभाग्यवान, शरीर कांतीने युक्त, समुद्र योगाचे फल -- राजासारिखें भाग भोगणारा. चक्र योगाचे फल -- नरेंद्र जे त्यांच्या मुगुटांच्या प्रभा ज्याचे चरणकमलावर शोभताहेत असा होतो. वीण योगाचे फल -- निपुण, गीत व नृत्य यांचे ठायी प्रीति.
अर्थ -- दामिनी योगाचें फल -- दाता, परकार्यतप्तर, पशुपालक; पाश योगाचें फल -- द्रव्योपार्जनशील, आणि सेवक व याहीं करुन युक्त. केदार योगाचे फल -- कृषि कर्म करणारा ( शेती ) आणि बहुतांचे कामी येणारा. शूल योगावे फल -- शूर, जखमी धनप्रिय, द्रव्यहीन.
अर्थ -- युग योगाचे फल -- द्रव्यहीन आणि पाखंडी. गोल योगाचे फल -- निर्धन, मलिन, मूर्ख, कुशिल्पी, आळशी, हिंडणारा. या प्रकारे हे नामसयोग फळांसह सांगितलें. ते आपआपल्या ग्रहांच्या दशांमध्ये निरंतर फलप्रद होतात असे जाणावे.