बृहज्जातक - अध्याय ११

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


राजयोगांची प्राप्ति ( वैतालीय )

अर्थ -- यवनाचार्याचे मतानें क्रूर ग्रह स्वोच्चस्थ असतां, तो क्रूर महीपति होतो. परंतु जीवशर्माचे मतानें तर तो क्षित्यधिपति ( राजतुल्य धनवान ) होतो.

राजयोगांचे बत्तीस प्रकार ( वसंततिलका )

अर्थ -- जन्मकाली स्वोच्चस्थ असें मंगळ, शनि, सूर्य, गुरु, या ग्रहांमध्ये एक लग्नी व बाकीचे तीन अन्यस्थानी असतील, तर हें चार योग, असेंच या चार ग्रहांतून तीन स्वोच्चस्थ असतां एक लग्नीं व दोन अन्यस्थानीं असतील तर हें बारा १२ योग मिळून ' सोळा १६ प्रकारचें राजयोग ' सांगितलें आहेत -- आणि या वरच्या चार ग्रहांतून दोन ग्रह स्वोच्ची असून, एक लग्नीं व एक अन्यत्र, व स्वगृहींचा चन्द्र कोठें तरी असेल तर, हें बारा योग व एकच ग्रह स्वोच्चस्थ असा लग्नी व चन्द्र स्वगृहीचा असेल, तर हे चार योग मिळून हें दुसरे ' सोळा १६ प्रकारचें राजयोग ' सांगितलें आहेत.

आणखी चव्वेचाळीस प्रकार

अर्थ -- लग्न किंवा चन्द्र हें वर्गोत्तमीचें असून ( अ. १, श्लोक ४ ) त्यांवर चार ग्रहांच्या दृष्टि असता पंधरा प्रकारचे योग होतात व पाच ग्रहांच्या दृष्टीने साहा प्रकारचे व साहा ग्रहांच्या दृष्टीने एक मिळून ' बावीस २२ प्रकारचें उपयोग ' सांगितले आहेत.

पांच प्रकारचे राजयोग ( शिखरिणी )

अर्थ -- कुंभेस शनि, मेषेंस सूर्य, वृषभेस चन्द्र, अशा तीन ग्रहांतून एक लग्नी असावा व मिथुनेस बुध, सिंहेंस गुरु, वृश्चिकेस मंगळ, या प्रकारचें ग्रह असतां, ह्या प्रत्येक लग्नीं तीन ' नृपतियोग ' होतात -- शनि, चन्द्र हे उच्चस्थ असतां ( तूळ, वृषभ लग्नी ) व सूर्य बुध कन्येस, तूळेस शुक्र, मेषेस मंगळ, कर्केस गुरु, असे असतां हें ' दोन नृपतियोग ' होतात.

तीन प्रकारचे राजयोग

अर्थ -- लग्नी शनि, मंगळ उच्चस्थ ( मकर लग्नस्थ ) धनेश सूर्य, चन्द्र, योगावर ' भूमिपति ' होतो -- मकर लग्नीं चन्द्र, मंगळ, रवि धनेश, हा दुसरा भूषतियोग ' -- मेषलग्नी सूर्य, धनेस गुरु, शनि चन्द्र हे सप्तमस्थानीं ( तूळेस ), असे योगावर ' क्षितिपति ' होतो.

दोन प्रकारचे राजयोग ( शिखरिणी )

अर्थ -- लग्नीं वृषभेस चन्द्र, चतुर्थस्थानीं रवि, सप्तमस्थानीं गुरु दशमस्थानी शनि या योगावर ' मानवपति ' होतो, -- लग्नीं मकरेस शनि, तृतीय स्थानीं चन्द्र, षष्ठस्थानीं मंगळ, नवमस्थ बुध, द्वादशस्थ गुरु, ह्या योगावर विस्तीर्ण अशा गुण व कीतीनें विख्यात असा तो ' मानवपति ' होतो.

तीन प्रकारचे राजयोग

अर्थ -- धनेस चन्द्र व गुरु, मकरपूर्वाधीं मंगळ, आणि शुक्र, बुध हें स्वोच्चस्थ ( मीनेस शुक्र, कन्येस बुध ), त्या योगांवर दोन ' नृपतियोग होतात -- ( लग्नीं ) कन्येस बुध, शनि, मंगळ मकरास ( पंचमस्थ ) व धनेंस गुरु, शुक्र व चन्द्र ( चतुर्थस्थ ) ह्या योगावर ' गुणवान नृपति ' होतो.

तीन प्रकारचे राजयोग

अर्थ -- लग्नीं मीनेस चन्द्र, कुभेस शनि, मकरेस मंगळ, सिंहेस सूर्य, ह्या योगांवर जो मनुष्य जन्मास येतो, तो ' पृथ्वीचें राज्य करितो ' -- मेष लग्नी मंगळ व कर्केस गुरु किंवा कर्क लग्नीं गुरु व मेषेस मंगळ ह्या दोनहि योगावर गुणवान धरणीपति ' होतो.

अन्य राजयोग ( बिद्युन्माला )

अर्थ -- कर्कलग्नीं गुरु, एकादशस्थ चंद्र, बुध, शुक्र आणि मेषेस सूर्य ( दशमस्थ ) असे ग्रहांचे योगावर ' पराक्रमी पृथ्वीनाथ ' होतो.

महान् राजयोग ( द्रुतविलंबित )

अर्थ -- लग्नीं मकरेस शनि, मेषेंस मंगळ, कर्केस चन्द्र, धनेस सूर्य, मिथुनेंस बुध, तूळेस शुक्र असे योगावर ' महान यशस्वी पृथ्वीनाथ ' होतो.

अन्य प्रकारचा राजयोग ( अनुष्टुप )

अर्थ -- स्वोच्चस्थ असा ( कन्येस ) बुध लग्नीं, दशमस्थानीं शुक्र; सप्तमस्थ गुरुचन्द्र, पंचमस्थानीं शनि, मंगळ या योगावर ' राजा ' होतो.

या योगाचें फळ

अर्थ -- वर सांगितलेलें राजयोगांनीं, नीच कुळांतले जरी ते मानव असले तरी ' राजयोगी ' होतात; मग राजवंशांत उत्पन्न झालेलें तर ' राज्य भोगणारे होतीलच ' पुढे सांगतो या योगांची राजवंशांत उत्पन्न होणारे जे, तें ' नृपति ' आणि वे राजवंशीय नसतील त्यांस ' नृपतुल्यता ' होते.

दुसरे राजयोग

अर्थ -- तीन ग्रह आपल्या उच्चराशीस किंवा आपल्या मूलत्रिकोणी वशिष्ठ असतील, ( संज्ञाध्याम २ यांत पहा ) तर राजवंशी जे ते ' नरेंद्र ' होतील आणि चार किंवा पाच ग्रह असें असतील तर हीन कुळांतलेहि ' नरेंद्र ' होतील -- जर हें तीन किंवा चार असे असूनहि पाच ग्रह बलहीन असें असतील तर राजे न होता ' धनवान् ' मात्र होतील.

सामान्य राजयोग ( विद्युन्माला )

अर्थ -- मेषलग्नीं चन्द्र, सिंहेस सूर्य, धनेस गुरु, मकरेस मंगळ, कुंभेस शनि, असें योगावर राजपुत्राचा जन्म असेल तर ' पृथ्वीनाथ ' होईल असें जाणावें.

सामान्य राजयोग

अर्थ -- स्वराशीस शुक्र असून तो चतुर्थस्थानीं ( कर्क, कुभ ह्या लग्नीं ) नवमस्थानीं चन्द्र आणि बाकी राहिलेले ग्रह लग्न, तृतीय, एकादश, या स्थानीं असतां यां योगावर ' भूमिपति ' होतो.

सामान्य राजयोग ( नवमालिक )

अर्थ -- तनुस्थानीं बसिष्ठ असा बुध व शुभ ग्रह हें बलिष्ठ असे शुभ ( नवम किंवा चतुर्थ ) स्थानी व बाकीचे ग्रह नवम, द्वितीय, उपत्त्य ( तृतीय, षष्ठ, दशम, एकादश ) स्थानीं असतील तर, राजवंशी असल्यास ' धर्मात्मा असा पृथ्वीनाथ ' होईल.

दोन सामान्य राजयोग

अर्थ -- लग्नीं वृषभेस चन्द्र, धनस्थानीं गुरु, षष्ठस्थानीं शनि व बाकीचे सर्व एकादशस्थानीं असतील तर, ' नृप ' होतो, लग्नी शनि, चतुर्थ गुरु, दशम चन्द्र, सूर्य व बाकीचें ग्रह एकादशस्थानीं असल्यास ' नृप ' होतो.

सामान्य राजयोग ( वसंततिलका )

अर्थ -- दशमस्थानी चन्द्र, एकादशस्थानी शनि, लग्नीं गुरु, धनस्थानीं बुध, मंगळ, सुखस्थानीं सूर्य, शुक्र, या योगावर ' नरेंद्र ' होतो. आणि लग्नी शनि, मंगळ, सुखस्थानीं चन्द्र, सप्तम गुरु, नवम शुक्र, दशम सूर्य, लाभस्य बुध, या प्रकारचें ग्रहयोगावर ' प्रजेश ' होतो.

राजयोगाची फलप्राप्ती केव्हा होते

अर्थ -- लग्नस्थ किंवा दशमस्य किंवा बलिष्ट असलेल्या ग्रहांच्या दर्शमध्ये ' राज्यप्राप्ति ' होते. शत्रुगृहीं, नीचगृही अशा ग्रहांची जी दशा ती छिद्रसंश्रयदशा जाणावी. ती ' राज्यहानि ' करिते.

विकृष्ट राजयोग ( मालिनी )

अर्थ -- बुध, गुरु, शुक्र यांतून एखादा लग्नस्थ सप्तमस्थ शनि, दशमस्थ सूर्य या योगावर ' भोगीं जन्म ' पावतात. केंन्द्री बलिष्ठ अशा सौम्य राशि असतील व पापग्रह हे क्रूरराशीस असतील, तर तशा योगावर भिल्ल, कोळी, चोर या ज्ञातीचा स्वामी व वित्तवान ' असा तो पुरुष होतो.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP