स्त्रीपुत्रांस अनिष्ट
अर्थ -- लग्न व चंद्र यांजपासून, पांचवे व सातवे ह्या स्थानाचे स्वामी शुभ असून, तेथेंच असतील -- किंवा त्या स्थानी त्यांची दृष्टि असेल तर पुत्र व स्त्री यांचे सौख्य होईल. असें नसेल तर त्यांचे सुख होणार नाही -- लग्नी कन्येस सूर्य व मीनेस शनि हें ग्रह स्त्रीस मृत्युकारक होतात. -- त्यातच पुत्रस्थानी मंगळ असेल तर तो पुत्रासही मृत्युलारक असे जाणावें.
भार्या - मरणयोग
अर्थ -- शुक्रापासून; हें चतुर्थ व अष्टम स्थानी असतां दहनानें भाजल्यामुळें उपग्रह स्त्रीमृत्यु. उग्र ग्रहांच्या मध्ये शुक्र असतां उंचावरुन अगर अन्य पडल्यामुळें स्त्रीस बंधनानें स्त्रीमृत्यु. मृत्यु - शुक्र सौम्य ग्रहांशी युक्त नसेल किंवा त्यांच्या दृष्टीनीही युक्त नसेल तर याप्रकारे स्त्रीवध ( मृत्यु ) जाणावा. वर स्त्रीच्या मृत्युस कारणीभूत होणारी विविध कारणे सांगितली ती विशेषतः तत्संबंधी विशिष्टपणें जाणावी.
स्त्री - व्यंग - दोष ( व. ति. )
अर्थ -- लग्नापासून चंद्र सूर्य हे, षष्ठ द्वादश स्थानी समोरासमोर असतील तर पुरुष व स्त्री ही उभयता एकाक्ष ( एका डोळ्यानें अंध ) असतील. सप्तम, किंवा नवम, पंचम स्थानी शुक्र सूर्य एकत्र असतील तर त्या पुरुषाची स्त्रीं एखादे अंगानें हीन असेल.
स्त्री - पुत्र - हीनता
अर्थ -- उदयलग्नी शनि व सप्तमस्थानी शुक्र संधिराशीवर ( गंडांत अ. १ पहा. ) असतां, आणि सुतस्थान हे शुभयुक्त, नसेल तर तो पुरुष वंध्यापति जाणावा. लग्न, सप्तम, व्यय, या स्थानी पापग्रह व क्षीन चंद्र, सुत किंवा जायास्थानी असेल तर पुत्र किंवा स्त्री असणार नाहीत.
व्यभिचारादिदोष - योग
अर्थ -- शनि मंगळ यांचे वर्गी ( षड्वर्गातील ) शुक्र असून ती सप्तमस्थ असेल व यावर या शनिमंगळांची दृष्टिही असेल तर तो पुरुष परस्त्रीगमन करणारा होईल. तेच शनि मंगळ चंद्रासह सप्तम स्थानी असतील तर तो व त्याची स्त्री असे उभयता व्यभिचारी असतील. शुक्र चंद्र हें सप्तम स्थानी एकत्र असतील तर त्या पुरुषास स्त्री किंवा पुत्र असणार नाहींत. नर व स्त्रीजाति असे दोन ग्रह सप्तम स्थानी असतील व त्याजवर शुभग्रहांची दृष्टि जर नसेल तर पुरुष द्वारकाळा स्त्रीपति होईल. अर्थात वृद्धापकाळी त्याचा विवाह होईल.
वंशच्छेद वगैरे दुर्योग
अर्थ -- दशमस्थ चंद्र, सप्तमस्थ शुक्र, चतुर्थस्थानीं पापग्रह, असे योगांवर वंशाचा उच्छेद होतो. हा वंशक्षययोग जाणावा बुधयुक्त द्रेष्काणी शनि केद्रस्थ असून त्या बुधास पाहात असेल तर तो पुरुष शिल्पी होतो. शुक्र व्यवस्थानी शनीच्या नवमांशी असेल तर तो दासीपुत्र, आणि सूर्य चंद्र हे सप्तमस्थानी असतां त्यांवर शनीची दृष्टि असेल तो पुरुष नीच. असे हे योग होतात.
रोग योग ( शार्दुलविक्रीडित )
अर्थ -- शुक्र, मंगळ हे सप्तमस्थ असून, त्यांवर पापग्रहांची दृष्टि असेल तर वाघ्यरोगी ( अंतर्गळ ) -- चंद्र हा कर्क किंवा वृश्चिक या नवमांशी असून तो पापग्रहाशी युक्त असेल तर गुह्यरोगी; चंद्र हा उदय लग्नी असून त्याच्या द्वितीय द्वादशस्थानी अशुभ ग्रह आणि सूर्य सष्तमस्थ असे योगावर श्वेतकुष्टी होतो. चंद्र दशमस्थ, मंगळ सप्तमस्थ, शनि वेशिस्थानीं ( सूर्यापासून दुसरा ), असे योगांवर विकलांग ( अवयवहीन ) असे जाणावें.
रोग योग ( वसंततिलका )
अर्थ -- सूर्य हा, मकरेस व चंद्र हा अशुभ ग्रहांच्या मध्ये असे असेल तर; श्वास, क्षय, ष्लिह, विद्रधि, गुल्म इ० रोगानी पीडित असेल -- सूर्य चंद्र हे परस्परांच्या राशीस; किंवा नवमांशी असतील तर शोषी किंवा कृश असा असेल.
कुष्ट योग ( वसंततिलका )
अर्थ -- चंद्र हा, धनराशींच्या मध्यभागी; किंवा मीन, कर्क, मकर, मेष, या अंशीं असून शनिमंगळांशी युक्त किंवा त्यांची दृष्टि असेल, तर कुष्टी होईल. वृश्चिक, कर्क, वृषभ, मकर, ह्या राशि. त्रिकोनी ( नव, पंचम ) पापग्रहांवह किंवा पापदृष्ट असतील तर कुष्टी असे जाणावे.
अंधयोग ( वैतालिका )
अर्थ -- अष्ट, षष्ठ, द्वितीय, द्वादश, या स्थानीं सूर्य, चंद्र, मंगळ, शनि हे कसेही असतील; तर त्यामध्ये जो बलवान् असेल त्याचे दोषनिमित्तानें नेत्रहीनता होईल.
कर्णमूळ योग वगैरे ( वैतालिका )
अर्थ -- नवम, पंचम, तृतीय, एकादश, या स्थानी पापग्रह असतील व त्यांवर शुभग्रहांच्या दृष्टि नसतील तर कर्णोपघात ( कर्णच्छेद, अभिरत्व ), आणितेच ग्रह सप्तमस्थानी असून, शुभइष्ट असतील तर वैतवैकृद जाणावे. ( यकृतासंबंधी दोष जाणावे. )
भूतबाधा वगैरे ( वैतालिका )
अर्थ -- चंद्र हा सग्नीं राहुग्रस्त ( ग्रहणात ); व नव पंचमस्थ पापग्रह ( शनि मंगळ ); असे योगांवर ' पिशाच्च बाधा ' होते. आणि असा जर सूर्य असेल तर नेत्रहीन असें जाणावें.
वातरोग व उन्माद रोग यांचें योग
अर्थ -- लग्नी गुरु, सप्तमस्थ शनि असे असता ' वातरोगी ' सप्तमस्थ मंगळ व लग्नी गुरु असें योगांवरही -- शनि लग्नी , व मंगळ पंचम, नवम, सप्तम, यांतून एका स्थानी असतांही ' उन्मादी ' शनि लग्नी, व मंगळ पंचम, सप्तम, यांतून एका स्थानी असतांही ' उन्मादी ' -- शनि व क्षीण चंद्रद्वादशस्थानी एकत्र असतां ' उन्मादी ' असें जाणावे.
दास्ययोग ( वसंततिलका )
अर्थ -- चंद्रस्थित राशिनवमांश स्वामी, सूर्य, चंद्र, गुरु, हे सर्व नीच नवमांशी किंवा शत्रू नवमांशी असतील तर ' दास ' होतो ह्यातून एक नीच नवमांशी असतां ' उपजीविकेस्तव दास ' दोन नवमांश नीच असतां ' विक्रीत दास ' व तीन चार नीच नवमांश असतील तर ' जन्मदास ' असे आणावें.
सामान्य दुर्योग - अनिष्टयोग ( हरिणी )
अर्थ -- मेष, वृषभ, धन, यांचे उदयकाळी ( लग्नी ) त्यांवर पापग्रहांची वृष्टि असेल तर ' विरुपदंत ' - पापग्रहांच्या राशि, धन, वृषभ, हे लग्नी असून त्यांवर पापग्रहांची दृष्टि असेल तर ' खल्वांट ' - सूर्य नवपंचमस्थ असून त्यावर पापग्रहांची दृष्टि असेल ' अदृढनेत्र ' -- असा शनि असेल तर ' अनेक व्याधि ' -- आणि असाच जर मंगळ असेल तर ' विकलांग ' ( अवयवहीन ).
वंधप्राप्ति ( पुष्पिताग्रा )
अर्थ -- घन, व्यय, सुत, धर्म, या स्थानी क्रूर ग्रह असतील तर स्थान राशीच्या बंधनासारिखे पदार्थानी ' बंधन ' -- किंवा भुजंग निंगड, पाश या द्रेष्काणी ( अ. २५ पहा. ) त्या स्थानराशि असून बलिष्ठ अशा पापग्रहांच्या दृष्टि जर त्यांवर असतील तर त्या द्रेष्कांणांच्या स्वभावासारिखें बंधन जाणावे.
अपस्मार क्षय वगैरे रोगप्रद दुर्योग
अर्थ -- चंद्र शनि हे एकत्र असतां ' अप्रियभाषणी ' यांवर मंगळाची दृष्टि असली तर ' अपस्मार ' ( फेफरें ); इतकेही असून ते ( शनि चंद्र ) दरिवेषयुक्त ( खळ्यांत ) असतील तर ' क्षयरोगी ' ; असे जाणावे. सूर्य, शनि, मंगळ हे शुभग्रहांच्या दृष्टिने रहित असे दशमस्थानी असतील तर तो पुरुष ' भृत्य ' ( चाकर ) होतो; यांतून जर एकच ग्रह ( दशमस्थ ) असेल तर ' श्रेष्ठ नृत्य ' दोन ग्रह असतील तर ' मध्यमभृत्य ' व तीनही ग्रह असतील तर ' अधमभृत्य ' असे जाणावे.