ग्रह स्वगृही वगैरे असतां फळ.
अर्थ -- ग्रह हें स्वगृहीं, मित्रगृहीं इत्यादि किती असतां कशी फलें होतात, ते खाली दाखविलें आहे.
१ २ ३ ४ ५ ६ ७
स्वगृ० -- कुलसम, कुलमुख्य, बांधवश्रेंष्ठ, धनिक, सुखी, भोगी, नरेंद्र
मित्रगृ० -- परजी, मित्रजी, आप्तजी, बंधुजी, मंडळ मुख्य, सेनापति, नरेंद्र
शत्रूगृ० -- धनहीन, सुखहीन, मूढ, व्याधित, बंधन, संतप्त, वध, पापी.
नीचगृ० -- धनहीन, सुखहीन, मूढ, व्याधित, बंधन, संतप्त, वध, पापी.
जन्मकाली एक जरी ग्रह उच्च असा असेल तर, राजा आणि तोच मित्रदृष्ट असा असेल तर, मित्र योगेकरुन विपुल धन आणि सन्मांनयुक्त असा येईल.
कुंभलग्नी जन्म असतां मतभेद
अर्थ -- जन्मकाळीं कुंभलग्न शुभ नव्हे असे सत्याचार्य म्हणतात आणि कुंभलग्नाचा अंश अशुभ असें यवनाचार्य म्हणतात. परंतु कुंभ लग्न किंवा त्याचा कोणताहि अंश अशुभच नव्हे हे म्हणणें अतिरेकी प्रसंगाचें असून कुंभलग्नाचा कुंभ नवमांश शुभ होय. असें विष्णुगुप्त म्हणतात.
होरेवरुन कांहीं फळें
अर्थ -- पापग्रह हें विषम राशीस सूर्याचे होरेमध्ये असतील तर, विख्यात, महान उद्योगी, बल आणि धन याहीं युक्त व तेजस्वी असा पुरुष होतो, शुभग्रह हें समराशीस चंद्राचे होरेत असतील तर, मृदु, कांति, सौख्य, शोभा, बुद्धी मधुरवाणी याहीं करुन युक्त असा होतो,
वरील प्रकारांत फरक असतां फळ
अर्थ -- पापग्रह हें समराशीस असून, सूर्याचें होरेत, आणि शुभग्रह, विषम राशीस चंद्राच्या होरेंत असतील, तर वर सांगितलेले गुण मध्यम होतील -- पाप -- ग्रह हे समराशीस चंद्राच्या होरेंत व शुभग्रह हे विषमराशीस सूर्याचे होरेंत असतील तर सांगितलेल्या गुणानीं हीन असा होईल.
द्रेष्काणपरत्वे चंद्राचे फळ
अर्थ -- चंद्र हा स्व किंवा मित्र द्रेष्कार्णी असेल तर, रुप व गुण हे उत्तम असतील आणि तोच अन्य द्रेष्काणी असतां त्या द्रेष्कार्ण स्वामीच्या गुणाप्रमाणे जाणावें. व्यालद्रेष्काण असतां उग्र, उद्यतायुधद्रे० असतां शस्त्रधारी, चतष्पाद्रे० असतां गुरुतल्पग पक्षी द्रे० असतां भ्रमणशील, अशीं चंद्राचें द्रेष्काणावरुन लक्षणें जाणावी. ( बाकीच्या ग्रहांच्या द्रेष्काणांची फलें अ. २५ मध्ये पहा )
चंद्रचे नवांशपरत्वे फळ
अर्थ -- चंद्र हा राशीच्या नवमाशी ( संध्येतील जन्मनांव, हा एक राशीनवमांशच आहे ) असतां फलें.
मेष - तस्कर सिंह - राजा धन - दास
वृष - भोक्त कन्या - क्लीव मकर - पापी
मिथुन - पंडित तूळ - शूर कुंभ - हिंस्र
कर्क - धनिक वृश्चिक - भारवाही मीन - निर्भय
वर्गोत्तम म्हणजे राशीच्या स्वनवमांशीं चंद्र असला तर तो पुरुष त्या त्या गुणांचा स्वामी होतो. चंद्र द्वादशांशांचें गुण राशीगुणाप्रमाणें जाणावें. ( राशी - शीलाध्याय जन्मराशीस्व० हें पहा. )
स्वत्रिंशांशी ग्रह असतां फळें
अर्थ -- ग्रह हें स्वत्रिंशांशी असतां ( अध्याय १ श्लोक ७ पह ) खाली दाखविल्याप्रमाणें फले होतात.
ग्रह स्वत्रिंशांशफलें
मंगळ -- स्त्रीयुक्त, भूपीत, उदार, अति तेजस्वी, अति साहसी
शनी -- रोगी, मृतपत्निक, विरोधी, परदारी, दुःखी, वस्त्रप्रावरणयुक्त मलिन.
गुरु -- सधन, यशस्वी, आनंदी, बुद्धिमान, तेजस्वी, पूज्य, निरोगी, उद्यमी, भोगवान.
बुध -- बुद्धि, कला, कपट, काव्य विवाद, शिल्प, शास्त्रार्थ, साहस अशा गुणांनी युक्त व अभिमानी.
शुक्र -- संतान, आनंद आरोग्य, भाग्य, धन, रुप, ही बहूत प्राप्त, तीक्ष्णपणा, सुंदर शरीर व इंद्रियोपभोगी.
( सूर्य चंद्र हें ग्रटूंच्या त्रिंशांशी असता फलें )
मंगळ शनि गुरु बुध शुक्र
सूर्य -- शूर क्रूर सदगुण सुखी सुकुमांर
चंद्र -- स्तब्ध हिंसक धनाढ्य पंडित मित्र