बृहज्जातक - अध्याय २०

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


सूर्याचें फळ

अर्थ -- सूर्य तन्वादिद्वादशस्थानीं असतां त्याची फलें

तनु - शूर, चिरकाली, नेत्रपिडित, निर्दंय - मेषेस असतां धनवान, नेंत्ररोगी - सिंहेस असतां निशांध, नीच ( तूळ ) - अंध, निर्धन, कर्केस अ. निर्बुद्धदास.

धन - विपुलधन, राजकारणानें धन हरण, मुखरोगी

सहज - बुद्धिमा, पराक्रमी                          मृत्यु - अल्प संतति नेत्र पींडा

सुख - सुखहीन, मानसी पीडा                   धर्मं - पुत्र व धन याही युक्त

सुत - अपुत्र, धनहीन                                कर्मं - सुख व शौर्य याहीं युक्त

शत्रु - बलवान, शत्रुजित                            आय - विपुल धन

जाया - स्त्रीकडूस अनादर                         व्यय - पतित, स्वकर्मं भ्रष्ट

चंद्राचें फळ.

अर्थ -- चंद्र, द्वादशस्थानस्थित फलें

लग्न -- मूक, उन्मत्त, जड, अंध, बधिर, नीच, दास.

कर्केस असतां - धनवान, मेषेंस असतां - बहुपुत्र.

वृषभेस असतां - धनवान.

द्वितीय - कुटुंबवान                      पंचय - बुद्धि, संतानयुक्त

तृतीय - क्रूर                               सप्तम - ईर्षायुक्त

चतु - संतानयुक्त                         अष्टम - बहुमति, रोगग्रस्त

षष्ठ - अनेक शत्रू, सकुमार मंदाग्नि, अल्प मथुन, उग्रस्व.

नवम - शोभायमान, पुत्र, मित्र, बंधू, धन याहीं युक्त.

दशम - यशस्वी, धर्म, बुद्धी, शौर्य याही युक्त

लाभ - स्थान गुणाप्रमाणेच प्राप्ति

व्यय - क्षुद्र, अव्ययहीन.

मंगळ व बुध यांचें फळ

अर्थ -- मंगळ द्वादशस्थानफलें           बुध - द्वादशस्थान फलें.

लग्न - शरीरवर व्रण          लग्नी - विद्वान     पं. - मंत्री

धन - कुभोजन                    द्वि. - धनिक         ष. - अशत्रू

नवम - पापरत -                तृ. - अतिदुष्ट        स. - धर्मज्ञ

राहिलीं स्थाने सूर्यवत        च. - पंडित           अ. - गुण हीन

राहिलेली स्थानें सूर्यवत घ्यावी.

गुरुचें फळ.

अर्थ -- गुरु द्वादशभाव फलें

लग्नी द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी

विद्वान सुवाक्य कृपण सुखी बुद्धीमान अशत्रु

सप्तम अष्टम नवम दशम एका द्वादश

बापसवाई नीच तपस्वी सधन लाभवान दुर्जंन

शुक्राचें फळ

अर्थ -- शुक्रद्वदशभावफलें - लग्न - रतिकुशल, सुखी

सप्त - कलहप्रिय, सुरतेच्छू. पंचम - सुखी. राहिलेली स्थानफलें गुरुप्रमाणें घ्यावी. मीनेचा शुक्र - कोणतेहि स्थानीं असतां घनाढ्य.

शनीचें फळ

अर्थ -- शनि द्वादशभाव फलें -- लग्नीं -- निर्धन, रोगीं, कामवश, अति मलिन, बाळपणीं व्याधीग्रस्त, गेडणे बोलणारा. गुरुगृहीं, स्वगृहीं, उच्चस्थ, असा शनि असतां राजतुल्य, ग्रामपुराधीप, पंडित, सुकुमारशरीर असें जाणावें आणि राहिली स्थाने सूर्यवत घ्यावी.

फलांचे तारतम्य

अर्थ -- लग्न हें तनु धरुन पुढें कुटुंब, सहज इत्यादि. अशा द्वांदशभावी. ( स्थानीं ) मिश्र, शत्रु, पर, स्व, उज्च अशा राशीस असलेल्या ग्रहांची फलें तत्सदृश जाणावी. सौम्य ग्रह हें स्थानवृद्धी ( भाववृद्धी ) करतात व पापग्रह हें स्थानहानि ( विपत्ती ) करतात. तेंच षष्ठ, अष्ट, द्वांदश या स्थानी सौम्य ग्रह हें स्थानहानी करतात व पापग्रह हें स्थानवृद्धि करतात. असे सत्याचार्य सांगतात.

ग्रहांच्या उच्चनीच अवस्थेचा शुभाशुभ फलांवर घडणारा परिणाम.

अर्थ -- बलाप्रमाणें ग्रहांची फलें.

उच्च मूळत्रि. स्वगृह, मित्रगृह, शत्रूगृहीं, नीच, अस्त, शुभ, संपूर्ण, पाऊण, अर्ध, पाद, अल्प, निर्फळ.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP