मृत्यूचें निमित्त
अर्थ -- अष्टमस्थानी जो ग्रह बलिष्ट दृष्टीने पाहात असेल, त्याच्या धातुकोपानें ( अध्याय २ श्लोक ५ - १२ पहा ) या अष्टमस्थराशीचा कालांग विभाग जो असेल त्या अवयवास पीडा प्राप्त होऊन मृत्यु - तो बलिष्ट ग्रह चरराशीस असता विदेशी, स्थिर राशीस असतां स्वदेशी, द्विस्वभाव राशीस असतां मध्यंतरी मृत्यु योग खाली दाखविल्या कारणापासून त्या त्या ग्रहांनी प्राप्त होतात --
सूर्य चन्द्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि
अग्नि जल आयुध ज्वर रोगकृत तृषा क्षुधा
अन्य कारणें
अर्थ -- सूर्य मंगळ हे चतुर्थ दशम ह्या स्थानी असतां शिलाप्रहारानें मृत्युचतुर्थ स्थानी शनि, सप्तमस्थ चन्द्र, दशमस्थ मंगळ असे योगावर विहिरोत मृत्यु - चन्द्र सूर्य हे कन्येस पापदुष्ट असतील तर स्वजनापासून मृत्यु -- उभयोदय म्हणजे मीन राशीस ( टी. द्विस्वभाव राशी म्हणजे ) चन्द्र सूर्य असतां पाण्यांत बुडून मृत्यु.
अन्य कारणें पुढे चालूं
अर्थ -- शनि कर्केस व चन्द्र मकरेस असतां जलोवरानें मृत्यु -- चन्द्र हा मंगळाचे राशीस पापग्रहांच्या मध्ये असेल तर, शस्त्र किंवा अग्निपासून मृत्यु - चन्द्र हा पापग्रहांचे मध्ये असा कन्येस असतां शोष व रक्तप्रकोपानें मृत्यु - चन्द्र हा शनीच्या राशीस पापग्रहाच्या मध्ये असेल तर, दोरी, अग्नि, पतन ( वृक्ष इत्यादि ) यापासून मृत्यु.
अन्य कारणें पुढे चालू
अर्थ -- पंचम, नवम ह्यानीं पापग्रह हे सौम्य ग्रहांच्या दृष्टीने रहित असतील तर बंधनानें मृत्यु -- अष्टमस्थानीं सर्प, पाश, निगद ( अ. २५ पहा ) हे द्रेष्काण असतील तर बंधनानें मृत्यु -- कन्येचा चन्द्र सप्तमस्थानी पापग्रहयुक्त, मेषेस शुक्र, सूर्य लग्नी अग्नि ( मीन ) असें योगावर मंदिरांत स्त्रीपासून मृत्यु.
आणखी कारणें पुढें चालूं
अर्थ -- मंगळ किंवा सूर्य हे चतुर्थस्थ, दशमस्थ शनि असें योगावर शूलव्यथेंने मृत्यु -- चतुर्थस्थ सूर्य, दशशस्थ मंगळ हे क्षीण चन्द्राचे दृष्टीने वक्री असतील तर शूलव्यथेने मृत्यु -- ह्या योगावर शनीची दृष्टी असतां काष्टताडनाने मृत्यु.
आणखी कारणें पुढे चालूं
अर्थ -- अष्टमस्थ चन्द्र, दशमस्थ मंगळ, लग्नस्थ शनि, चतुर्थस्थ सूर्य असे ग्रहयोगावर काष्टप्रहारानें मृत्यु -- हेंच ग्रह क्रमाने दशम, नवम, लग्न पंचम ह्या स्थानी असतां धूम, अग्नि, बंधन, ताडन याहींकरुन मृत्यु जाणावा.
आणखी कारणें पुढे चालूं
अर्थ -- चतुर्थस्थ मंगळ, सप्तमस्थ सूर्य, दशमस्थ शनि असे योगांवर शस्त्र; अग्नि, राजकीय यापासून मृत्यु. -- द्वितीयस्थ शनि, चतुर्थस्थ चन्द्र, दशमस्थ मंगळ असे ग्रह असतां क्षतांमध्ये कृमि पडून मृत्युयोग जाणावा.
मृत्यु - कारणे पुढें चालूं
अर्थ -- दशमस्थ सूर्य, चतुर्थस्थ मंगळ असे योगांवर वाहनावरुन पतनानें मृत्यु -- मंगळ सप्तमस्थ, शनि, चन्द्र व रवि हे हे लग्नस्थ असे योगांवर यंत्रपिडेसे मृत्यु -- तूळेस मंगळ, मेषेस शनि, चन्द्र मकर कुंभेस असे योगांवर ग्रह असता दुर्गधीमध्ये मृत्यु -- क्षीण चन्द्र दशमस्थ, सप्तमस्थ सूर्य चतुर्थस्थ मंगळ असे योगांवरही दुर्गधींत मृत्यु जाणावा.
मृत्यूचीं कारणे पुढें चालूं
अर्थ -- क्षीण चन्द्रावर बलिष्ट अशा मंगळाची दृष्टी असेल व शनि हा अष्टमस्थानी असेल तर गुह्यस्थानी रोग होऊन तेथे कृमि, शस्त्र, दाह यांची पीडा होऊन मृत्यु जाणावा.
मृत्युची कारणें पुढे चालूं
अर्थ -- सूर्य मंगळ हे सप्तमस्थ, अष्टमस्थ शनि, चतुर्थस्य क्षीण चन्द्र असे योगांवर पक्ष्यापासून मृत्यु -- लग्नीं सूर्य पंचमस्थ मंगळ, अष्टमस्थ शनि, नवमस्थ चन्द्र असे योगावर पर्वताकरुन किंवा वीज पडून किंवा भिंत पडून मृत्यु जाणावा.
द्रेष्काणावरुन मृत्युज्ञान ( वैतालिका )
अर्थ -- जन्मस्थ द्रेष्काणापासून बाविसावा द्रेष्काण मृत्युस कारण होतो; असे पूर्वमुनीनी सांगितले आहे. त्या द्रेष्काणाचा स्वामी किंवा अष्टमस्थान राशीच्या स्वामी आपल्या गुणाप्रमाणें मृत्युदायक होतो असे जाणावे.
अंतकालीन भूमि व स्थिति
अर्थ -- लग्न नवमांशस्वामी ज्या राशीस असेल त्या राशीसारिखे भूमीवर मृत्यु किंवा तिच्याशी युक्त किंवा दृष्टी असलेल्या ग्रहांवरुन त्या भूमीची कल्पना करावी -- लग्नाचें नवमांश जितके उदयास येथे बाकी असतील तितका वेळपर्यत मृत्युसमयी मूर्च्छा जाणावी -- लग्नस्वामी लग्नास पाहात असेल, तर याहून दुप्पट वेळ मूर्च्छा -- व तो स्वामी जर शुभ ग्रह असेल तर तिप्पट वेळ मूर्च्छा जाणावी.
मृत्युनंतर शरीरपरिणाम पूर्व व परजन्मज्ञान
अर्थ -- अष्टमस्थानी जो मृत्यु देणारा द्रेष्काण असेल, त्याच्या तत्त्वगुणाप्रमाणें सर्व परिणाम जाणावा. जसे अग्नि द्रेष्काणाने, जलद्रेंष्काणानें मिश्रद्रेष्काणानें, व्यालद्रेष्काणाने जळून भस्म होणे, सडून जाणे, शोधून सुकून जाणें, विटंबना होणें, शास्त्रांतरी ( भृगुसंहितादि कर्म विषाकादि ) विस्तार सांगितलेले आहेत त्यावरुन पूर्व जन्म व पुढील गति यांचे परिणाम जाणावे.
प्राणी कोणत्या लोकांतून आला व स्थिति
अर्थ -- गुरुचा देवलोक, चन्द्रशुक्रांचा पितृलोक, सूर्य मंगळांचा तिर्यकलोक, शनिबुधांचा नरकलोक -- सूर्य चन्द्रामध्ये जो बलवान त्याच्या द्रेष्काणस्वामीच्या लोकाहून तो प्राणी जन्मास आला असें जाणावे. तो द्रेष्काणस्वामी उच्च, मध्य, नीच जसा असेल तसा त्या लोकी तो प्राणी श्रेष्ठ, मध्यम, नीच होता असे जाणावे.
मृताची गति ( मालिनी )
अर्थ -- षष्ट, अष्ट किंवा सप्तम स्थानांच्या द्रेष्काणस्वामीप्रमाणें किंवा त्या स्थानी असलेल्या ग्रहांप्रमाणे त्या त्या लोकी गति जाणावी ( श्लोक १४ पहा ) -- गुरु हा षष्ट, अष्ट किंवा केन्द्री स्वोच्चस्थ असेल तर -- किंवा मीन राशीस शुभ नवांशीं असा लग्नी जर तो गुरु असेल आणि बाकीचे ग्रह बलहीन असतील तर मोक्षगति जाणावी.