बृहज्जातक - अध्याय ८

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.


आयुष्यांतील सुखदुःखाचे भेद

दशोपक्रम ( मालिनी )

अर्थ -- लग्न, सूर्य, चंद्र यांतून जे बलवान असेल, त्याचे केद्र, पणफरा दिकस्थ ग्रहांचे, क्रमानें प्रथम, मध्य, अन्त्य वयांमध्ये, दशेचा फलपाक होतो. म्हणजे लग्न जर बलवान आहे तर प्रथम वयामध्ये दशा बलवान होते. सूर्य बलवान आहे तर मध्य वयामध्ये, व चन्द्र बलवान आहे तर अन्त्य वयामध्ये. आतां या तिघांमध्ये प्रत्येकाचें पोटांत त्यांचे त्यांचे केंद्र, पणफर, आपोक्लिमस्थ ग्रहांच्या दशा अनुक्रमानें घ्याव्या. जर केन्द्री ग्रहांचा अभाव असेल, तर पणफर - व तेथेंहि अभाव असेल तर, आपोक्लिम -- या क्रमानें दशाक्रम बसवावा -- तसेच लग्न, सूर्य, चन्द्र यांत केन्द्रीचे कोणी बलवान नसतील, तर -- पणफरस्थच प्रथम वयामध्ये फलदायक. तेही नसल्यास आपोक्लिमस्थ फल देणारे होतील.

दशावधि व द्वैधनिर्णय

अर्थ -- ग्रहांचे आयुर्दाय केलेलें असतील, त्यांत जो बलिष्ट असेल, त्याची दशा प्रथम ( बर सांगितल्याप्रमाणे तीस वर्षे त्याच्या दशेस्तव ) घ्यावी. पुष्कळ ग्रह एकत्र असतील तर ज्याची अधिक वर्षे ती प्रथम घ्यावी. त्यांतहि सारखें असतील तर जो प्रथम उदयास आला असेल तो पहिल्यानें घ्यावा.

अंतर्दशा ( वसंततिलका )

अर्थ -- अन्तर्दशेस्तव ग्रह आपणाशी युक्त असलेल्या ग्रहास आपले वर्षातून निम्मे वर्षे काढून देतो व आपणापासून नव - पंचम असलेल्यास १।३ देतो व सप्तम स्थानी असलेल्यास १।७ देतो व चतुर्थ -- अष्टम स्थानीं असलेल्यास १।४ देतो, लग्न दशेची वर्ष पण याच क्रमानें जाणावी.

अंतर्दशाविभाग ( इंद्रवज्रा )

अर्थ -- अंतर्दशेच्या ग्रहांची स्थानें पाहून, त्याप्रमाणें त्यांचे अपूर्णांक रुपाने अमशच्छेंद मांडून ( १।२, १।३, १।४, १।७ ) त्या सर्वास समच्छेद रुप द्यावे, नंतर छेद पुसून टाकावे व ते अंश गुणक समजून त्या ग्रहांचे दशाब्द पिंडास ( वर्षास ) गुणून छकानी भागावें. येतील ते दशाभेद ( अंतर्दशा ) जाणावें.

संपूर्ना व रिक्तादशा ( वैतालिका )

अर्थ -- जन्मकालीन ग्रह उत्तम बळी, स्वोच्चांशी, असतां त्या दशेस संपूर्णा दशा म्हणावी - बलहीन, नीत्तांशी, शत्रु नवमांशी, असतां ती ' रिक्तादशा ' अनिष्ट फल देणारी असें जाणावें.

दशेचे प्रकार

अर्थ -- परमोच्च अंशापासून पुढें गेलेल्या ग्रहांचे दशेस ' अवरोही ' --मित्र नवमांशी, उच्चाशीं, अशांचे दशेस ' मध्या ' - परम नीचांशापासून पुढे गेले - त्याचें दशेस ' आरोहिणी ' - नीचांशी, शत्रु नवांशी, च्या दशेस ' अधमा ' असे म्हणावें.

आणखी प्रकार

अर्थ -- नीचांशी, शत्रु नवांशीं, जरी ग्रह आहे आणि तो जर स्थानबल पावला असेल; तर ती दशा ' मिश्रा ' -- प्रकारें आपल्या नावाचे गुणाप्रमाणे ती ती दशा फलदायक होते. त्यांची फळें ग्रहांच्या दशा फळामध्ये यथोपयोग्य क्रमाने सांगेन.

लग्नाची दशा

अर्थ -- लग्नाची दशा अशी कल्पिलेली आहे, द्विस्वभाव लग्नाचें प्रथम द्रेष्काणास ' अधमा ' -- दुसर्‍या द्रेष्काणास ' मध्यमा ' -- तिसर्‍या द्रेष्काणास. ' पूजिता ' -- चर लग्नाचे द्रेष्काणाविषयी याहून उलटा क्रम जाणावा. -- स्थिर लग्नाविषयीं पहिल्या द्रेष्काणास ' अशुभा ' -- दुसर्‍या ' इष्टा ' -- तिसर्‍यास ' सभा ' असे जाणावें.

नैसर्गिक दशा

अर्थ -- ग्रहांच्या नैसर्गिकदशा ( स्वाभाविकदशा ) ची वर्षे जन्मल्यापासून प्रथम च्रद १ वर्ष, मंगळ २, बुध ९, शुक्र २०, गुरु १८ सूर्य २०, शनि ५० वर्ष मिळून १२० वर्षे या क्रमाने ग्रह आपआपल्या बळाप्रमाणें स्व - दशेमध्ये पूर्ण फळ देतात. याच्या शेवटीं लग्नाची दशा शुभफलदायक असे यवनाचार्य मतानें आहे. परंतु ते कोणास मान्य नाही.

दशाफल

अर्थ -- दशास्वामी ( ज्यांची दशा तो ) दशा प्रवेश वेळेच्या लग्न कुंडलींत, लग्नीं, मित्रगृही, सौम्यगृही, स्ववर्गी असा जर असेल, तर ती दश शुभफलदायक होईल. किंवा ( तीन - दहा - सहा - अकरा ) या उपचय स्थानीं दशास्वामी असेल तरी शुभग्रह देईल. याच प्रकारे त्या कुंडलीचा चन्द्र, मित्रगृही, उच्च, उपवयस्थानी, त्रिकोणी, सप्तमस्थानी यांतून एक प्रकारचा जरी असेल तरी ती दशा उत्तम फलप्राप्ति करील. जर तो चंद्र पाप, नीच, असा अन्य प्रकारचा असेल, ' तर दशा निष्फळ ' बाणावी.

दशाफळें ( शार्दूलविक्रिडित )

अर्थ -- दशा प्रवेशकाळीच चन्द्र स्वगृही असल्यास, मान, धन, सौख्य देणारी तो दशा होईल. मंगळाचे गृही जर चंद्र असेल तर स्त्रीस दूषणदायक -- बुध गृही असेल तर विद्या, मित्र, धन दायक -- सिंहेस असेल तर दुर्ग, अरण्य मार्ग, गृह या स्थली कृषिकर्म करवील -- शुक्रगृही असेल तर उत्तम अन्नाची प्राप्ति -- शनिगृही असेल तर कु - स्त्री प्राप्ति -- आणि गुरुचे गृही असेल तर सम्मान, अर्थ, सौख्य यांची प्राप्ति असे जाणावें.

गृहदशाफळें ( शार्दुलविर्किडित )

अर्थ -- सूर्यदशाफल -- सूर्याचें उत्तम दशेमध्ये, नख ( वाघनखादि ) दंत ( हस्तिदंतादि ), चर्म ( मुग - व्याघ्र चर्मादि ), सुवर्ण, क्रूरता, मार्ग, राजा, युद्ध यापासून धनप्राप्ति आणि उग्रपणा, धैर्य, निरंतर उद्योगीपणा, विख्याति, प्रतापेकरुन श्रेष्ठत्व इत्यादिक श्रेष्ठ फलें प्राप्त होतात.

सूर्याचे अनिष्ट दशेमध्य -- स्त्री, पूत्र, धन, शत्रू, शस्त्र, अग्नि, राजा यापासून पीडा प्राप्त, त्यागीपणा ( उदासी ) पापबुद्धि, सेवकांशी कलह, छातीस व उदरास पीडा व रोगवृद्धि अशी वाईट फलें मिळतात.

अर्थ -- चंद्रदशाफल -- चंद्रासी शुभ दशा प्राप्त असता -- ब्राह्मण - क्षत्रियद्वारा मंत्रप्राप्ति ( गुप्त मसलत ), उंस व दूध यांचेपासून झालेल्या पदार्थांनी केलेलीं पक्वान्नें इत्यादिक वस्त्रें, पूष्पे, क्रीडा, तिळांचे पदार्थ, अन्नें श्रम यापासून शुभफल मिळतात.

अशुभ दशेतील फलें -- निद्रा, आळस यांचे ठायी आसवित; क्षमाशील, देव - ब्राह्मण भक्ति, कन्याजन्म, बुद्धि, कीर्ति, वृद्धि यांची क्षयवृद्धि आणि बलिष्ठाज्ञीं व स्वपक्षाशीं वैर होतें.

अर्थ -- मंगळदशा फल -- शत्रूंचा नाश, भूपति, बंधू, भूमि, ऊर्णा याही करुन धनलाभ. हें मंगळाचे शुभ दशा प्राप्त असतां होते.

अशुभ दशेची फलें - सुख, मित्र, स्त्री, बंधू, विद्वान, गुरु यांचे ठिकाणी द्वेष, तृष्णा, रक्त, ज्वर, पित्त मोवणेम ( अवयव ) परस्त्री इत्यादि कारणांनी रोगप्राप्ति व पापिष्ट जनांशी प्रीति, अधर्माची प्रवृत्ति, कठोर भाषण, उग्र स्वभाव इत्यादि अनिष्ट फले होतात.

अर्थ -- बुधदशाफल -- दूतपणा ( वकिली, मध्यस्थी ) मित्र, गुरु, ब्राह्मण व क्षत्रिय यांपासून धनलाभ, विद्वानापासून प्रशंसा, यश, युक्ति, द्रव्य, सुवर्ण, अश्व, भूमि, सुभाग्य, सौख्य, यांचे लाभ, हास्य, उपासन ( खुशामत, आर्जव ) कौशल्य, बुद्धिवृद्धि, धर्मकार्ये इत्यादिची सिद्धि. अशीं शुभ दशेत फलें होतात.

अशुभ दशेत -- कठोर भाषण, श्रम, बंधन, मानसिक व्यथा, त्रिदोषपीडा, ( वात - पित्त - कफादि ) ही फलें होतात.

अर्थ -- गुरु दशाफल -- सन्मान व गुणांचा उदय, बुद्धि - वृद्धि, कांति, प्रतावेकरुन वरचढपणा, माहात्म्य ( मोठेंपणा ) उद्यम, मंत्रनिति, ( राजनिति ) नृपति, स्वाध्याय ( वेदपठण मंत्र जपादि ) याहीं करुन धनलाभ, सुवर्ण, अश्व, पुत्र, हत्तीं, वस्त्रें यांची बहुत प्राप्ति. भूमिपतीशीं स्नेंहप्राप्ति. याप्रकारें शुभदशेचीं फले होतात.

अशुभदशेची फलें -- सूक्ष्म तर्काविषयीं असाध्य श्रम, कर्णरोग, धर्महिनांशीं द्वेष, अशी फलें होतात.

अर्थ - शुक्रदशाफल -- गीत, रति, आनंद, सुरभि द्रव्ये ( गाईचें दुग्धादि पदार्थ, सुगंधि द्रव्ये, सुवर्ण द्रव्ये ), अन्नपान, वस्त्रें, स्त्री, रत्नें, कांति, रतिसुखाचीं साहित्ये, ज्ञान, इष्ट, मित्र यांची त्राप्ति, क्रयविक्रब करण्यांत कुशलता, कृषि ( शितकी ) निधि ( गुप्त धन ), धन यांचे लाभ, अशीं शुभ दशेची फलें होतात.

अशुभ दशेची फलें -- अनेक राजे, अनेक कनिष्ट जातीय लोक, धर्मरहित यांशी वैर आणि स्नेहापासून शोकप्राप्ति अशी फलें होतात.

अर्थ -- शनि दशाफल -- गाढवें, उंटे, पक्षी, म्हशी, वृद्ध स्त्रिया यांची प्राप्ति, कारखानें किंवा ग्राम, पुर यांची मालिका ( महाल, परगणें, तालुके इ. ) यांच्या अधिकारावर सन्मानित, कु - धान्यांचा लाभ ( बाजरी, कोद्रु, मकई इ. ) अशीं फलें शुभ दशेत होतात.

अशुभ दशेची फलें -- कफविकार, ईर्ष्या, वातविकार, कोप, चित्तभ्रम, मलिनता, सुस्ती, खेद, याही करुन श्रमित ( दुःखी ) सेवकजन, पुत्र, स्त्री यांजकडून अनादर आपण अवयवभंग होणें अशी वाईट फलें होतात.

दशाफलांची उपपत्ति ( उपजातिका )

अर्थ -- दशेच्या ठायी शुभग्रहांची दशा शुभ फल देतें व अनिष्ट ग्रहांच्या दशा अशुभ फलें देतात व मिश्र ग्रहांच्या दशा मिश्र फलें देतात. लग्नदशा लग्नपतीच्या फलाप्रमाणें जाणावी.

अन्य दशाफळें ( शालिनी )

अर्थ -- संज्ञाव्ययामध्ये ( अध्याय २ ) ज्या ग्रहांचे जे पदार्थ सांगितलेले आहेत ते व र्काजीवाध्यायामध्ये जे सांगणे आहे, ते व भावस्थानांची, दृष्टीची योगोंद्भव ( सांगणे आहेत ) इत्यादिक फलें त्यांच्या त्याच्या या दशेत योजावी.

दशेचा देहावर परिणाम. ( इंद्रवज्रा )

अर्थ -- ग्रहाच्या दशा, छायारुपाने ( देहींस्थतीनें ) पंच महाभूतें ( पृथ्वी आप, तेज, वायु, आकाश ) स्पष्ट दर्शवितात. -- पृथ्वीचा गुण गंध नाकाचेठायों; जळाचा गुण रस मुखांत, तेजाचा गुण रुप नेंत्रांत, वायूचा गुण स्पर्श त्वचेवर, आकाशाचा गुण शब्द कर्णास. याप्रकारे ग्रहांचीं तत्त्वें ( स्वस्वदशेत ) नेहमीं अनुभव देत असतात. ( अ. २ श्लोक ६ )

फलावरुन दशा ओळखणें ( मालिनी )

अर्थ -- शुभफलांच्या दशेमध्ये अन्तरात्मा तसाच बहुत प्रकारची सौख्ये व अर्थप्राप्तीनें उत्पादन करतो. यास्तव बर सांगितलेल्या फल विपाकांनीं चालू असलेल्या दशेच्या ठायी सांगितलेली फले परिणाम पावतात. तो ग्रह स्वबळेकरुन स्वप्नांत व मनोरथामध्ये अनुभव देत असतो. यास्तव तकीनें ग्रहाची चालती दर्शा ओळखून काढावी.

द्वैतनिर्णय ( वसंततिलका )

अर्थ -- एका ग्रहाची दोन फलें एकमेकास विरुद्ध असतील तर त्यांत जे अधिक फल ते दुसर्‍याचा नाश करते -- दोन ग्रहाची फलें परस्पर विरुद्ध असतां ते फलांचा नाश न करतां आपआपल्या दशेमध्ये ती फलें प्राप्त करितात, असे जाणावे.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP