बृहज्जातक - अध्याय २२

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


कारकयोग ( वैतालिका )

अर्थ -- स्वक्षेंत्री, स्वोच्च, स्वमूलत्रिकोण अशा स्थानीं असलेलें ग्रह परस्पर केद्राश्रित असतील; आणि विशेषेकरुन परस्परांच्या परस्परांच्या दशमस्थानीं असतील; तर तें ग्रह कारक संज्ञक होतात.

कारकांचे उदाहरण ( रथोद्धता )

अर्थ -- जसें, कर्कलग्नी स्वगृहीचा चंद्र; व मंगळ, शनि, सूर्य, गुरु, हें उच्चस्थ म्हणजे रवी मेषेचा मंगळ मकरेचा गुरु कर्केचा शनि तुळेचा असें असतां ते ग्रह परस्पर कारक जाणावें कारण तें लग्नस्य ग्रहास परस्पर चतुर्थ म्हणजे लग्न चतुर्थ सप्तक व दशम याप्रमाणे येतात.

अन्य कारकयोग ( अनुष्टुप )

अर्थ -- स्वगृहीं, मूलत्रिकोणी, उच्च, हे ग्रह परस्पर दशमस्थ असतां कारक होतात; आणि मित्रत्व असणारे ग्रहही परस्पर दशमस्थ असतां कारक होतात.

शुभ जन्म ( अनुष्टुप )

अर्थ -- वर्गोतमाशी ( राशिस्वनवमांशी ), लग्न व चंद्र असतां -- बेंशिस्थानीं ( सूर्याचे द्वितीयस्थानी ) शुभग्रह असता -- केद्री कोणी तरी ग्रह असता -- परस्पर कारक संज्ञक ग्रह असता -- अशा योगावर जन्मास येणारांचा जन्म शुभ होतो.

दशाफलांचा प्राप्तीकाल ( वैतालिका )

अर्थ -- गुरु, जन्म ( चंद्र ) स्वामीं, लग्नस्वामी हे केंद्री असतीस; तर मध्यवयामध्ये सुखदायक -- पृष्ठोदय, उभयोदय, शीषोंदय, या राशीस असणारे दशास्वामी हे मध्ये, अंती, प्रथम ह्या अनुक्रमाने दशाफळ देतात.

अष्टकवर्ग फलाचा समय

अर्थ -- सूर्य मंगळ हे प्रवेश होताच, गुरु शुक्र मध्ये, शनि चंद्र अंती व बुध सर्वकाळ असें ग्रहाचें फळ देण्याचें काळ आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP