चंद्रस्थ ग्रहदृष्टीची फळे
अर्थ -- चंद्र हा मेषादि बारा राशीस असतां त्यावर मंगळादि ग्रहांच्या दृष्टीची फलें अनुक्रमानें कोष्टकांत खाली दाखविली आहेत.
राशि मंगळ बुध गुरु शुक्र शनि सूर्य
मेष भूप पंडित राजतुल्य गुणी चोर निर्धन
वृषभ निर्धन चोर नृपूज्य भूप धनिक दास
मिथुन शस्त्रवि राजा पंडित निर्भय कोष्टी निर्धन
कर्क योद्धा कवि ज्ञानी भूपति शस्त्रजिवि नेत्ररोगी
सिंह भूपति ज्योतिषी घनाढ्य नरेंद्र नापित राजा
कन्या स्त्रियाश्रय भूप सेनापती नेपुण्य स्त्रियाश्रय स्त्रियाश्रय
तूळ नीचकृती भूप सुवर्णकार वणिक नीचकृति नीचकृति
वृश्चिक भूपति युन्मपिता नम्र रंगकार व्यंग निर्धन
धन दंभी शठ ज्ञातिश्रेष्ठ भूमिपति जनाश्रय दंभी शठ दंभी शठ
मकर भूप राजाधिराज राजा पंडित धनवान निर्धन
कुंभ परदार भूप राजतूल्य परदार परदार परदार
मीन पापी हास्यप्रिय राजा पंडित पापी पापी
होरादिस्थ चंद्राच्या फलांची योजना
अर्थ -- लग्नाच्या दोन होरा, त्यांचे स्वामी सूर्य चन्द्र असतात. यास्तव चन्द्र हा ज्या स्वामींच्या होरेस असेल, त्या स्वामीच्याच होरेत असणारे ग्रहांची दृष्टी जर त्या चद्रावर असेल, तर शुभ होय -- तसेंच द्रेष्काणादिक स्वामींच्या दृष्टीचीहि फलें जाणावी -- मित्र गृही असलेल्या ग्रहांची दृष्टी असतां पण शुभ होय -- जीं प्रत्येक राशीच्या ग्रहांची दृष्टीफलें वर सांगितली तीच चंद्र ज्या द्वादशांशीं असेल त्यासही योजावी -- तसेंच नवमांशाविषयीं पण सूर्यादिकांची दृष्टीफलें घ्यावी.
चंद्रगत नवांश विवक्षित ग्रहांचा असतां चंद्रांचे ठिकाणी
सूर्यादि ग्रहांची दृष्टि असतां फळें
अर्थ -- चंद्र हा ज्या ज्या ग्रहांच्या नवमांशी असेल त्यावर ग्रहांच्या दृष्टीची फलें कोष्टक.
नवमां० -- सूर्य मंगळ बुध गुरु शुक्र शनि
मंगळ -- रक्षक हिंसक युद्धकुशल भूप धनवान कलही
शुक्र -- मूखं परदार श्रेष्ठ कवि सत्काव्य सुखासक्त परदारी
बुध -- मल्ल तस्कर कविराज मंत्री गीतज् शिल्पनिपुण
चंद्र -- अल्प धनलोभी तपस्वी मुख्य स्त्रीपोष् कार्यासक्त
सूर्य -- क्रोधी राजप्रिय निधीश प्रभु अपुत्र अतिहिंसक
गुरु -- विख्यात बळ अल्पपुत्र हास्यज्ञ मंत्री कामही वृद्धशील
धन असूनहि दुःखी
शनि -- युद्धशिक्षक विख्यात बळ अभिमानी स्वकर्म कु. स्त्रीप्रिय कृपण
धन असूनहि दुःखी
चंद्रावर जशी सूर्यादिकांची दृष्टीफलें तशीच सूर्यावरहि चंद्रादिकदृष्टीची फलें घ्यावी.
फलांचे तारतम्य
अर्थ -- चंद्र हा राशीच्या वर्गात मांशी, स्वनवमांशीं आणि परववमांशीं असेल तर, जे शुभदृष्टी फल तें उत्तम, मध्यम, कनिष्ट या क्रमानें होईल -- अशुभ दृष्टीजल जे, तें उलटें क्रमानें जाणावें. चंद्र ज्या नवमांशीं असेल त्याचा स्वामी जर बलवान असेल तर प्रथमपासूनच फलदायक. तो नवमांशपति बलवान नसेल तर राशिस्वामीचेंच दृष्टीफल चंद्रमा देतो.