Dictionaries | References

उलंडणें

   
Script: Devanagari

उलंडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

उलंडणें

 उ.क्रि.  
   कलंडणें ; लवंडणें ; पालथें करणें ; सांडणें . दिव्य रत्न गोंफणिलें । अहा अमृतपात्र उलंडिलें ॥ - ह ३० . १९ . तों पितर क्रोधें पाहती । याणें अन्याय केला म्हणती । दुग्ध उलंडिलें क्षितीं । निष्क्रोध पुत्र देखोनी ॥ - जै ९६ . १५ .
   उलटून पडणें ; उन्मळून पडणें ; उपटून येणें . जें तुटलिया मुळापाशीं । उलंडेल कां शाखांशीं ॥ - ज्ञा १५ . ५० . तंव देखिले सहोदरजैसे उलंडले तरुवर ॥ - कथा २ . १२ . ८४ .
   उसळून येणें .
   भरुन वाहणें ; तुडुंब भरणें . दुराशेनें ह्रदय उलंडी . - दावि २८४ .
   ( लवंडणें या अर्थी ) खालीं पडणें , निजणें . भूमीवरी उलंडली । - रावि ३८ . ६ . मूर्छना येऊनि उलंडला । - सप्र १२ . २४ .
   त्याग करणें ; सांडणें ; टाकणें . भले अवघेचि सोडाआधी देवाला धुंडा । आशा ममता उलंडा । ज्ञानें काळाला दंडा ॥ - दावि ४८० .
   ओलांडणें पहा . [ सं . उत + लुंठ ; प्रा . उल्लुंड ; किंवा सं . उत + लुट ; प्रा . उलुट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP