Dictionaries | References

गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख

   
Script: Devanagari

गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख

   गुराला भूक लागली तरी खावयास मागतां येत नाही त्‍यामुळे ते क्षूधेची पीडा निमूटपणे सहन करते व जेव्हां मालक घालील तेव्हां चारा खाऊन स्‍वस्‍थ राहाते त्‍याचप्रमाणें मुलाला दुखणें झाले असतां त्‍याला ते काही बरोबर वर्णन करून सांगता येत नाही. त्‍यामुळे त्‍याला ते सहन करावे लागते व जे औषध मिळेल ते घेऊन जेव्हां दुखणें बरे होईल तेव्हां होईल, तोपर्यंत दुःख काढावे लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP