Dictionaries | References

फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये

   
Script: Devanagari

फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये     

झाडावर असतांना फळ जितकें चांगलें दिसतें व मनांत भरतें तितकें तोडल्यावर दिसत नाहीं
तसेंच झाडावर फळ कांहीं दिवस टिकून चांगलें पिकतें तसें तोडल्यावर होत नाहीं. याकरितां तें झाडावर असतांनाच विकावें व मग तोडावें
म्हणजे अधिक लाभ होतो व नुकसान येत नाहीं. त्याचप्रमाणें गळूं पिकण्याच्या पूर्वी फोडल्यास निचरा व्हावयास वेळ लागतो व अधिक त्रास होतो. याकरिता त्यास प्रथम पिकवण बांधून तें पिकवावें व मग फोडावें. याप्रमाणें योग्यवेळीं कोणतीहि गोष्ट करावी. उतावळीनें केल्यास त्रास होतो व नुकसानहि होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP