Dictionaries | References

बुडवणूक

   
Script: Devanagari
See also:  बुडवणी

बुडवणूक

  स्त्री. 
   बुडविणें ; बुडविण्याची क्रिया ( शब्दश : व ल० ).
   बूड ; नाश ; अध : पात . धर्ममार्ग पापपरिणामी असून तो देशास बुडवणूक आणणारा असा त्यांचा ग्रह आहे . - नि ४२० . [ बुडणें ] बुडवणी - वि . भांड्याला दोरी न लावतां हातानेंच भांडें बुडवून भरुन घेतां येईल इतकें खोल ( पाणी , विहीर , टांकें इ० ). बुडविणें - उक्रि .
   पाणी इ० मध्यें पदार्थ घालणें , न दिसेसा करणें ; बुडण्यास लावणें .
   ( ल . ) मग्न करणें ; बुचकळणें .
   ( आयुष्याचा ) नाश करणें ; निरुपयोगी बनविणें . आपण मरुन गेला व बिचारीला व्यर्थ बुडविली .
   बंद करणें ; बंद पाडणें ; थांबविणें .
   नुकसान करणें ; फसविणें ; लुबाडणें . [ बुडणें ] बुडव्या , बुडवणा , ण्या - वि . नाशास , र्‍हासास कारणीभूत ; बुडविणारा ( मनुष्य ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP