Dictionaries | References

रुपे

   
Script: Devanagari

रुपे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : चांदी

रुपे

  न. रजत ; अशुद्ध चांदी ; ही मौल्यवान धातु प्राचीन काळापासून नाणी , दागिने इ० करितां उपयोगांत आणल्या जाणार्‍या धातूंपैकी आहे . ही धातु फार तन्य व घनवर्धनीय आहे . - ज्ञाको ( र ) ११७ .
   चंगकांचन खेळांतील एक रंग .
   जोंधळ्याचा हिरवा पाला . [ सं . रुप्य ; प्रा . रुप्य ] रुपेरी - स्त्री . ( जर ) नुसती चांदीची जरतार - वि .
   रुप्याचे केलेले .
   रुप्याचा मुलामा दिलेले .
   रुप्यासारखे दिसणारे . - रुपेरीकांटा - पु . बाभळीचा कांटा . ( हा पांढरा असतो यावरुन ). रुपेरी डोळे - पुअव . पांढरे डोळे ; कवडीसारखे डोळे . रुपेरी डोळे करणे - मरणे . रुप्याचे डोळे होणे - अंतकाळ आल्यामुळे डोळे पांढरे होणे ; मरणोन्मुख होणे . रुपेरी निखल ( निलख )- न .
   छीट ; चित्रवस्त्र ; खडी किंवा चित्रे अगर वेलबुट्टी काढलेले कापड .
   रौप्यपट . [ फा . ] रुपेरी पाऊस - पु . शोभेच्या दारुकामांतील रुप्यासारखा फुलांचा ( नळा इ० लावला असतां ) पडणारा पाऊस . रुपेरी पेरण - स्त्री . पांढर्‍या पाठीची पेरण . ( पेरणा = फर्न ; नेच्याच्याजातीचे झाड ). रुपेरी बिडी - बेडी - स्त्री . ( ल . ) सेवावृत्ति ; द्रव्याच्या लालचीने करुन घेतलेले बंधन . ही रुपेरी बेडी आपोआप तुटली यांत मला आनंदच आहे . - संन्याशाचा संसार . रुपेशाई लोखंड - न . शिक्केशाई लोखंडापेक्षा कमी प्रतीचे लोखंड . रुप्यात सफेत मुलामा - पु . ( ल . ) पांढरा रंग ; रुप्यासारखा रंग . केसांवर जरादेवीने रुप्याचा सफेत मुलामा चढविल्यामुळे शरीर शिथिल दिसे . - विवि ८ . १ . ५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP