Dictionaries | References

उतरती

   
Script: Devanagari
See also:  उतरता

उतरती

 वि.  
   उतरण असलेला ; उताराचा .
   क्षीण होत चाललेला ; अधोगतीस गेलेला ; खालीं येणारा .
   अदृश्य होत असलेला ; मावळता . उतरता दिवस .
   क्रमानें खालीं येणारा .
   ( गंजिफा , पत्ते इ० खेळांत ) दहिल्याचे मागें नवल्यानें , त्याच्या मागें आठ्ठ्यानें हुकूम व्हावें अशीं उतरतीं पानें . चढती , उतरती कमान - स्त्री . उत्कर्षावस्था व निकृष्टावस्था ; उत्कर्ष , अपकर्ष ; बरेवाईट दिवस .
०पाया  पु. अवनत स्थिति ; अवनति ; अधोगति ; हीन स्थिति .
०कळा   दशा पायरी - स्त्री . विपन्नावस्था ; र्‍हास ; खालावलेली स्थिति . उच्चावस्था प्राप्त झाली कीं त्याबरोबरच उतरती कळा लागावयाची . - विवि ८ . ९ . १६१ . उतरत्या पायरीस लागणें - र्‍हास होत जाणें . तो उतरत्या पायरीस लागला .
०बाजु  स्त्री. 
   उतरण ; उतरत येणारी बाजू . याच्या उलट चढती बाजू .
   दशावतारी गंजिफांतील परशरामापासून पुढील पांच बाजू .
०भांजणी  स्त्री. ( गणित ) भारी परिमाणाच्या अंकास हलक्या परिमाणाचें रुप देणें ; जसें - रुपयाचे आणे करणें वगैरे .
०वेळ   खालीं जाणारा दिवस ; दोन प्रहर टळल्यानंतर सायंकाळपर्यंतचा काळ .
   खालावलेली स्थिति ; वार्धक्याचा काळ .
०श्रेढी  स्त्री. ( गणित ) पदांची एक मालिका ; यामध्यें संख्या क्रमाक्रमानें लहान होत जातात .

उतरती

   उतरता पाया
   अवनत स्थिति
   अधोगति
   हीनावस्था
   निष्कृष्ट अवस्था.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP