श्रीकेशवस्वामी - भाग १

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद १ लें

मळों न सके मळ हे सर्वथा । तेंचि निज निर्मळ तत्त्वतां ॥१॥ध्रु॥

अतिशुद्ध स्वरूप आपुलें । जें कां पूर्ण सहजचि संचले ॥२॥

विमळा अति विमळ परम । त्रिगुण कर्मारहित निःसीम ॥३॥

गुरूकृपें केशविं निर्मळ । आपेंआप येकलें केवळ ॥४॥

० पद २ रें (घाटी- वासुदेव)

रविपरीस अति सोज्ज्वळ । जें चंद्राहुनि बहु सीतळ ।

जें अनादि-सिद्ध निर्मळ । जेथें हरपे समुळ गा ॥१॥

तें स्वरूप वासुदेवाचें । माझें हृदयि बिंबले सांचे गा ॥ध्रु॥

जें मंगळा निज-मंगळ ॥ जें गुह्यांचे गुह्य केवळ ।

जे निष्कामघाम निष्कळ । जे अनंत तरुचें फळ गा ॥२॥

जें अगम्य आगोचर । जें ब्रह्मादिकांसी पर ।

जें निजात्मसिद्धीचें घर ॥म्हणे केशव निरंतर गा ॥३॥

तें स्वरूप वासुदेवाचें ॥

० पद ३ रें

देह रांहो अथवा जावो । परि आम्ही कोठें न जावों ॥ध्रु॥

देह जन्मतां नयो आम्ही जन्मा । नाशतांचि नाश नाही आम्हां ॥१॥

देहेंद्रिय होतां घडमोडी । आमुच्या स्वरूपीं न पडे वोढी ॥२॥

गुरुकृपें केशवी पाहीं । आमुच्या स्वरूपीं येणें जाणें नाहीं ॥३॥

० पद ४ थें

अजि भुवनसुंदर राम देखिला । सखा पूर्ण सकळकाम देखिला ॥ध्रु॥

मन माझें सखीय सुख पावलें । रूप लक्षीतां निज० पद फावलें ॥१॥

भवतापविमोचन देखिला । राम राजीवलोचन देखिला ॥२॥

गोपिनाथ मुरलीधर देखिला । देवराज रमावर देखिला ॥३॥

मायारात्रि-हरण-दीप देखिला । स्वामी माझा यादवभूप देखिला ॥४॥

आत्माराम हृदयवासी देखिला । म्हणे केशव आनंदराशि देखिला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP