० पद ५०२ वें
निजसखया सद्गुरु रामा । सुखस्वरूप केलें आम्हां ॥ध्रु॥
काय उपकार वानूं तुझा । देव तुजविण नेणें दुजा ॥१॥
परवस्तूचें रूप दावीलें । सेखीं तद्रूप मजला केलें ॥२॥
तुझ्या पायींची वंदिली माती । तेणें केशवीं येव्हडी प्राप्ती ॥३॥
० पद ५०३ वें
पूर्वसंस्कारें निज काम ऊठे । काम निष्कामीं श्रीराम भेटे ॥ध्रु॥
कैसा कामाचि श्रीराम झाला । सम दरुशने काम निमाला ॥१॥
कामीं निष्काम निजसंतृप्ती । आत्मारामीं जाहली तृप्ती ॥२॥
केशव म्हणे रामीं आराम । तेथें कैंचे विषम काम ॥३॥
० पद ५०४ वें
राम पाहे तो डोळस भला । देहे पाहे तो आंधळा झाला ॥ध्रु॥
किती सांगावें कोण्हासी । अर्थ नेणवे जनांसी ॥१॥
रामसंगी तो स्वानंद योगी । कामसंगी तो रंवरंव भोगी ॥२॥
म्हणे केशव गुरु देव संत । तिन्ही मिळुनी तूं आनंत ॥३॥
० पद ५०५ वें
काळ संतसंगें हा कंठूं । प्रेम भगवंताचें लुटूं ॥ध्रु॥
ऐसें सामर्थ्य हाता आलें । बळ संतदयाचें जालें ॥१॥
राम स्वानंघन रस सेवूं । चित्त राम-पादांबुजिं ठेवूं ॥२॥
राम सर्वत्र समदृष्टी पाहों । म्हणे केशव रामाचि आहों ॥३॥
० पद ५०६ वें
आदि-पुरुष सर्वेश्र्वर । ज्याचे विधी शेष किंकर ॥ध्रु॥
तो जानकी-जीवन राम । माझे जिवाचा निजविश्राम ॥१॥
जो आदित्सकुळिचा अर्क । जो मुनिवर-कुळदिपक ॥२॥
जो कैलासपतीचा धनी । केशवाचा मुगुटमणी ॥३॥
० पद ५०७ वें
जो सकळाचा चालक । दीनबंधु जगपालक ॥ध्रु॥
माझा राम मजजवळीं । नित्य नांदे हृदय-कमळीं ॥१॥
जो अखिल सुरांचा रावो । आदिपुरुष कमळा-नाहो ॥२॥
जो अच्युत-० पददायक । केशवाचा निजनायक ॥३॥
० पद ५०८ वें
राम जितांची न भेटे । कां सेवणें गिरि-कपाटें ॥ध्रु॥
जितां श्रीरामीं भेटावें । रामरूपीं मिळोनि जावें ॥१॥
हातोहातीं गवसा राम । सर्व सांडुनि विषयकाम ॥२॥
गुरुकृपें केशवीं भेटी । राम भरला पाठीं-पोटीं ॥३॥
० पद ५०९ वें
राघव० पदजीवनीं मज्जन गुरुवाक्यें केलें ।
तन्मय मन झालें मीपण विरोनियां गेलें ॥ध्रु॥
अमृतसागर तो वळला रघुविर वो माय ।
अंतरीं सुखी जालें शब्दें सांगावें काय ॥१॥
सुखघन सुकुमार राम निज० पद-दातार ।
भजतां साचार तो सरला सहजचि संसार ॥२॥
अनंत गुणराशी आत्मा निर्गुण अविनाशी ।
केशव म्हणे ध्यातां जालें अद्वय-० पदवासी ॥३॥
० पद ५१० वें
योगियांचा विश्राम । सांवळा सुंदरराम । स्मरतां पुरले सर्व काम ॥
आनंद झाला, आत्माघननीळ घरा आला ॥ध्रु॥
बुद्धीचें अधिष्ठान । ध्यातां विरालें ध्येय-ध्यान । सर्वांभूती समसमान ॥१॥
केशवाचा निजस्वामी । अलिप्त गुण कर्म नामीं । लक्षितां सब ह्य अंतर्यामीं ॥२॥
० पद ५११ वें
धन्य ते प्राण जपती रामनाम । संसारिक काम सांडुनियां रे ॥ध्रु॥
रामनाम गजरें गर्जती निरंतरी । मोक्ष त्यांचे घरीं बळेंचि रिघे ॥१॥
नामाचा घोष करिती रात्रंदिवस । पळती महादोष तेणें धाकें ॥२॥
तृणकाष्टसंभार जाळी वैश्र्वानर । पातकाचे भार जळती नामें ॥३॥
रामनामीं रत जाले जे अखंड । कळीकाळाचें तोंड ठेचिलें तिहीं ॥४॥
काया-मनें-वाचा उच्चारू नामाचा । केशव म्हणे त्याचा देव शरण ॥५॥
० पद ५१२ वें
कमळवल्लभ राम आनंदराशी । हृदयकमळ-कोशीं चिंतिशी त्यासी ॥ध्रु॥
अक्षय० पदिंचा राव तरि तूं होशी । तिष्ठती सकळ सिद्धी तुजची पाशीं ॥१॥
नवल केव्हढें माय सांगो मी काय । सर्वकाळीं सुख रामभक्तासी आहे ॥२॥
कृपेचा सागर राम प्रत्यक्ष पाहीं । उद्धरलें जडजीव माझ्या रामाच्या पाईं ॥३॥
म्हणवुनि रामचरणीं पावे निश्र्चळ राहीं । निवशी आत्मबोधें मग हा संसार नाही ॥४॥
योगियांचे धन राम माहेर विश्र्वाचें । शंकराचें जीवन राम गुह्य गुह्यांचें ॥५॥
सर्वभूतीं रामरूप ठसावलें सांचे । सद्गुरुकृपें केशवीं दर्शन जालें रामाचें ॥६॥
० पद ५१३ वें
सुभानकुळींचा निजभानु । राजीवलोचन रघुनाथू ।
दशरथवंशी कुळदीपकू । रमा-रमण जो विख्यातु ॥ध्रु॥
त्यावीण न गमे क्षणभरी । करूं मी काय सखीय वो ।
अहेतुक आठव स्वामिचा । अखंड होतो बाइय वो ॥१॥
कोदंडधारी पूतनारी । मदनारी सुखदायक वो ।
त्रिभुवन तारी विधिजनकू । विश्र्वंभर सुरनायक वो ॥२॥
अनाथबंधू चिंत्सिंधु । परमानंदु रघुरावो ।
केशव म्हणे मन त्याविण हें । विसरोनि गेलें देहभावो ॥३॥
० पद ५१४ वें
त्रिभुवन-सारा अविकारा । शोकविनाशक अवतारा ॥ध्रु॥
शरण दयानिधि तुज आलों । परम० पदीं या स्थिर जालों ॥१॥
सकळ सुखाच्या निजधामा । तारक नामा सम रामा ॥२॥
नासुनि माया मति जाया । म्हणे केशव अद्वय रघुराया ॥३॥
० पद ५१५ वें (राग - कांबोध)
भेट दयानिधी झडकरि रामा । शाश्र्वत गति तरि समीपचि आम्हां रे ॥ध्रु॥
हृदयकमळीं तुझें स्वरूपचि भासे । जन्म-मरण-भय तरि सर्व नासे रे ॥१॥
रमणिय ० पद तुझें वर्णीजे वेदें । तेथें सदा मज ठेवी अभेदें ॥२॥
पूर्णरूपा पूर्ण प्रत्यक्ष होई रे । केशवस्वामी निज संपत्ती देई रे ॥३॥
० पद ५१६ वें
आसनीं, शयनीं, भोजनीं, गमनीं वो । दीसती राजाराम तो नयनीं वो ॥ध्रु॥
करणें आतां कैसें आम्ही वो । डोळियांमाजीं भरला स्वामी वो ॥१॥
पाहतां विचारू सकळ वो । संचला घनश्याम निळख हो ॥२॥
गुरुमुखें पूर्ण प्रत्यक्ष जाला वो । केशवीं भेटी होताचि निमाला वो ॥३॥
० पद ५१७ वें
नयन माझें निडारले वो बाई, अवलोकितां स्वरूप रामाचें ॥ध्रु॥
स्वानंदघन सनातन निःसीम, चिंतिती मुनिजन मनिं साचे ।
तें रूप माझें हृदयिं कोंदलें पारणें फिटलें जिवाचें ॥१॥
विमळाविमळ, निष्कळ, नीरुपम, निर्गुण निरामय जें वो ।
गुरुकृपें केशवीं निरखित तन्मय जालें सखिये वो ॥२॥
० पद ५१८ वें
अरे हरी साधीं तूं संगती साची । रामरूपीं चित्तवृत्ती ज्याची ।
राम सर्वदा अंतरी ध्याती । सर्वभूतीं राम पाहती ॥ध्रु॥
भोगितां नित्य सुख रामासी । नाठवेचि देहभाव ज्यासी ।
निजबोधें नित्य विरालें । म्हणे केशव स्वयं राम जालें ॥१॥
० पद ५१९ वें (धाटी - कांबोध)
ध्याति मनीं नयनीं आम्हां राम दिसे वो ।
अहर्निशीं लागलें कसें रामपिेसें वो ॥ध्रु॥
सर्वकर्मीं राम दिसे रामाविण दुजें नसे ।
जेथें पाहूं तेथें वसे राम सय्य वो ॥१॥
सद्गुरुकृपें केशवीं पहातां नवल कसें वो ।
सबाह्य अंतर वेधिले येणें राघववेशें वो ॥२॥
० पद ५२० वें
काशी अयोध्यावासी वो । राम पहा अविनाशी वो ।
स्मरतां ज्या नामासी वो । सुटला पळ कामासी वो ॥ध्रु॥
धन्य अयोध्येचें जन रे । जे अवलोकिति रघुनंदन रे ।
तनुविण करी अभिवंदन रे । नलगे तया भवबंधन रे ॥१॥
गुरुचरणींचे वासी हो । ० पदो० पदीं त्यां काशी हो ।
समाधि त्याची दासी हो । असें बोलत केशव जोसी हो ॥२॥
० पद ५२१ वें ( राग -कांबोध )
मायातीता राघवा विश्र्वरूपा । सदोदीता दशरथ कुळदीपा रे ॥ध्रु॥
ध्यान तुझें लगलें मज पाहीं । तुजपरते आणीक नेणें कांहीं ॥१॥
सीताकांता मदनारी प्राणनाथा । जगजनका तारका भगवंता रे ॥२॥
मनमोहना करुणाघना रामा । म्हणे केशव विसरूं नको
आम्हां रे ॥३॥
० पद ५२२ वें (राग -कांबोध )
नाम तुझें गाइन वेळोवेळां रे । रूप तुझें पाहीन निजडोळां रे ॥ध्रु॥
येरे रामा अवाप्त सर्वहि कामा रे । तुझीं पाउलें न सोडी मेघश्यामा रे ॥१॥
ध्यान तुझें करिन अंतर्यामी रे । तुझा विसर न पडो आतां स्वामी रे ॥२॥
कृपासिंधु अनाथबंधु देवा रे । म्हणे केशव करिन चरणसेवा रे ॥३॥
० पद ५२३ वें
सरोजनेत्रा । दशरथपुत्रा । पंचमुखमित्रा । वेदांतसूत्रा ॥ध्रु॥
त्रिभुवनजनका रे । रामा रघुकुल टिळका रे ॥१॥
आनंदरूपा । निज० पदभूपा । रविकुळदीपा । ज्योतिस्वरूपा ॥२॥
अनादिसिद्धा । पूर्णप्रसिद्धा । नित्य-शुद्ध-बुद्धा । सुखार-विंदा ॥३॥
सिद्धांतसारा । निज विकारा । सहज अपारा । परम उदारा ॥४॥
विश्र्वप्रकाशा । दुरित-विनाशा । अनंत वेशा । केशव-ईशा ॥५॥
० पद ५२४ वें
घडि घडि घडि चरण तुझे आठवती रामा ।
आसनीं शयनीं भोजनीं गमनीं छंद तुझा आम्हां ॥ध्रु॥
दृश्यातीत ज्ञानघना नित्य निर्वीकारा ।
अंबुज-दळ-नयन मुनि-मानस-विहारा ॥१॥
सर्वोत्तम सर्वगुरु सर्वसाक्षीरूपा ।
प्रमयातीत पूर्णब्रह्म दशरथ कुलदीपा ॥२॥
तात, मात, भा्रत, नाथ तूंचि एक पाही ।
केशवप्रभु तुजविण मज आणिक प्रिय नाहीं ॥३॥
० पद ५२५ वें
रामाचें रूप देखियलें ग बाई ये । मन निवालें चित्त तन्मय झालें ।
सौंसार दरिद्र लया गेले ग बाईय ॥धु्र॥
देखतां देखन आठवेना ग बाईय । हृदयीं आनंद सांठवेना ।
आठव दोनी गेलें तेथें हरपोनी, जोडला अखंड रामराणा
ग बाईये ॥१॥
रामरूपें विण तंव कांही ग बाईय, दुसरा अध्यास मज नाहीं ।
सर्वभूत-विश्राम सांवळा सुंदरराम, विराला देहभाव त्याच्या पाईं ग बाईये ॥२॥
सद्गुरुनें दया आजि केली ग बाईय, कल्पना समूळ लया गेली,
माया निमाली, माझी कार्यसिद्धि पूर्ण झाली केशवस्वामीनें भेटि दिल्ही ग ॥३॥
० पद ५२६ वें
रामाचें रूप पाहियलें ग बाईय । इंद्रयासहित बुद्धि माझी निवाली ।
निवांत मग राहिलें ग बाईय ॥ध्रु॥
दशरथकुळदीपक ग बाईय राम हा त्रैलोक्यनायक ।
स्वानंदसागर राम रमावर ध्यातां विरालें भवदुःख ग बाईये ॥१॥
मंगळामंगळ रूप ग बाईय राम हा सायुज्यभ्ज्ञूप ।
आठवितां चित्त माझें तद्रूप जालें कोंदला सबाह्य चिद्रूप ग बाईय ॥२॥
हृदयकमळविश्राम ग बाईय कमळनयन । मेघश्याम ।
सद्गुरुकृपा बोधें केशव म्हणे पूर्ण भेटल निरंतर राम ग बाईय ॥३॥
० पद ५२७ वें
देखीलें देखीलें तुझें पाउलें रामा
आनंदानें मन जालें समाधान । त्रिविधताप माझे गेले विरामा ॥ध्रु॥
जननीजनक तूं देव रमापती । विश्र्वंभरा विश्र्वमूर्ति दयाळा ।
हृदयकमळीं तुज ध्यातां निरंतर । मायेसहित अंत जाला कळिकाळा ॥१॥
तूंचि सुखघनहरी सबाह्य अंतरीं । संतसंगें करी प्राप्ति तुझी रे ।
केशव म्हणे पूर्व पुण्यपूर्ण झालें । हारपली मती तव चरणीं माझी रे ॥२॥