जय मृत्युंजय - विधिज्ञांनी पहा राव ...
गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.
विधिज्ञांनी पहा राव येथे कमावले नांव
न्याय-अन्यायाची फॊड केली आम्हांसी अतोड !
लढविले बुद्विवाद उंच बांधले प्रासाद
विद्वत्तेचे तुम्हां लेणे सोडा रक्तांत खेळणे ।
जाँन पार्किन्स पामर सांगतसे सुविचार
तुम्ही ज्ञानाचे भांडार करा बुद्वीचा व्यापार ।
देवदानवांचे रण न्यायान्यायाचें कारण
दैत्यगुरु शुक्रमणी विद्या होती संजीवनी ।
देवपुत्र कच गेला संजीवनी शिकण्याला
गेला शत्रूच्या गोटांत शिरे शुक्राच्या पोटांत ।
मंत्र केला नामशेष त्यास पावे परमेश
होतां दुर्बळ असुर झाले जयी सुरवर ।
विनायक चिंती मनीं जाय मंत्र सहा कानी
गेली गुप्तता लयाला इंग्रजांचा भाव गेला ।
फोडले मी रिपुद्वार दैत्यविद्येचे कोठार
सुखेनैव करा वार नाशंवत हें शरीर ।
म्हणे, पार्किन्सा पामरा थोर अज्ञानी तूं खरा
अज्ञ लोकांचे भारती घेतले मी कार्य हाते ।
काम तेंचे लढवितां शुल्क बेडी येई हातां
मातृमूर्ती देशांतली तुम्ही रक्ताने माखली ।
धूत मी तें रक्त सारे शुद्व करितो मंदिरें ।
भव्य सौधासाठी नाही मिळविली मी विद्या ही
उंच पताकेचा मान राखण्याला माझे ज्ञान ।
करु देहाची कां चिंता कृष्ण भारताचा त्राता
देवकार्याचा विस्तार हाच माझा अलंकार ।
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP