मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
सावरकर कारेत खरोखर अग्निद...

जय मृत्युंजय - सावरकर कारेत खरोखर अग्निद...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


सावरकर कारेत खरोखर अग्निदिव्य जगले ।
माती जळली मूस ओतली कांचन चमचमले ॥
ऐरणीवरी दो सुवर्णकण ।
मोजित होते काळाचे क्षण ।
झेलत झेलत अंगावर घण ।
तेज अग्निचे मुद्रेभवती वलयाकृति जमले ।
माती जळली मूस ओतली कांचन चमचमले ॥१॥
किंवा स्वातीतील शिंपले ।
जलबिंदूंना धरते झाले ।
मौक्तिक ते संपुटांत बनले ।
शिंप उघडता मोती कंठी मानाने रमले ।
माती जळली मूस ओतली कांचन चमचमले ॥२॥
शिलेतुनी प्रतिमा घडवीती ।
टाकीन परि मानवमूर्ती ।
शासक मृण्मय करुं पाहती ।
बोथट होई टाकी आसन मूर्तींना नमले ।
माती जळली मूस ओतली कांचन चमचमले ॥३॥
चणे चावणे लोखंडाचे- ।
होते उरले वीरवरांचे ।
म्हणुनी बंधन बंद-घराचे ।
देवत्वा पावता भिंतिचे बंधन ढासळले ।
माती जळली मूस ओतली कांचन चमचमले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP