जय मृत्युंजय - कैक अयने लोटती अन् रत्न क...
गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.
कैक अयने लोटती अन् रत्न कोणी जन्म घेते ।
लोपता आभा जनांना कौस्तुभाची जाण येते ।
दैव देते कर्म नेते ॥धृ०॥
पाहती ना जोंवरी तो
लोकचिंता वागवीतो ।
संकटांना तोंड देतो ।
मात्र होतां राख त्याच्या गीत गाती गौरवाते
दैव देते कर्म नेते ॥१॥
राष्ट्र तारी सिद्व सेना ।
शत्रु खाई दुर्बलांना ।
हिंदु-नेता सांगतांना-
कान केले बंद आम्ही । भाळलो संमोहनाते ।
दैव देते कर्म नेते ॥२॥
व्हावयाची शक्तिशाली ।
बुद्वि ना आम्हास झाली ।
फाळणी हातांत आली ।
अन्यथा "आदर्श" होती प्राप्त पदवी भारताते ।
दैव देतें कर्म नेतें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP