जय मृत्युंजय - टाकुनी पाठिशी भूतकाळाला ।...
गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.
टाकुनी पाठिशी भूतकाळाला ।
भूमिची लावली धूळ भाळाला ॥धृ०॥
ठेवला पाय नौकेत ! वाटे मना-
जिंकली ! तोडले सागरी बंधना ।
मातृभूची करी चित्त आराधना ।
अंतरीच्या दिसे तीर डोळ्याला ।
भूमिची लावली धूळ भाळाला ॥१॥
डोलते नाव उत्तुंग लाटांवरी ।
चित्त हेलावते सागराच्या परी ।
क्षेम भूमीस नेईल का ही तरी ?
तोच तांडा खगांचा नभी आला ।
भूमिची लावली धूळ भाळाला ॥२॥
वाटले मातृभू येथुनी दूर ना ।
आणि आश्चर्य ! राई दिसे लोचना ।
शाश्वतेची तयें साक्ष येई मना ।
वाहिली मानसी क्रांतिला माला ।
भूमिची लावली धूळ भाळाला ॥३॥
वंग होता सदा क्रांतीने पेटता ।
रक्तसंमार्जने धूळ मंत्रांकिता ।
ती विभूती शिरी आदरे लावता ।
शक्ति विस्तारली देशकार्याला ।
भूमिची लावली धूळ भाळाला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP