जय मृत्युंजय - ठेवा मोडून लेखणी । खड्गा...
गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.
ठेवा मोडून लेखणी । खड्गाला घ्या चला रणी ।
पुरवा सामग्री पुढच्यांना काव्य करो आणखी कुणी ॥धृ०॥
साहित्याची शैवलिनी
वाहे दुथडी भरभरुनी
गेलां तुम्ही समरावर जर पडेल का ती तये उणी ॥१॥
वय तुमचे तारुण्याचे
रक्त नवे सळसळण्याचे
कुमुद कौमुदी यावर नाही समर्थतेची उभारणी ॥२॥
देशाला सामर्थ्य हवे
लेखणी न केवळ पुरवे
खांद्यावर बंदूक टाकुनी सिद्व रहा देशरक्षणी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP