समासोक्ति अलंकार - लक्षण ७
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां, ‘निशामुखं चुम्बति चन्द्र एष:’ या ठिकाणीं निशा या स्त्रीलिंगाला व चंद्र या पुल्लिंगाला, मुखचुंबन या अर्थाची जोड मिळाल्यानें, त्यापसून नायिकात्व व नायकत्व सुचित होतें, ही गोष्ट निर्विवाद आहे. असें न मानलें तर (म्ह० स्त्रीलिंगपुल्लिंगावरून, व्यंजनेनें नायकादि प्रतीति न मानली तर) ‘निशामुखं चुम्बति चन्द्रिकैषा’ ‘अहर्मुखं चुम्बति भानुबिम्बम ।’ इत्यादि वाक्यांतही, नायकादिकांची प्रतीति होऊ लागेल. या सुचित नायिकात्वाचा वनायकत्वाचा सामानाधिकरण्य संबंधानें विशेवर नायिकात्वारोप (व चंद्रावर नायकत्वाचा) होण्यांतच शेवट होणार (हें उघड आहे). [मग स्पष्टपणें असें का म्हणत नाहीं ? फक्त व्यवहाराचा आरोपच (प्रकृतधर्मीवर) कां मानतां ?] शिवाय तुम्हाला आधारभूत (उपजीव्य) ग्रंथ जो अलंकारसर्वस्त्र त्याच्या
“स्वत:चें स्वरूप न सोडणारे निशा व चंद्र यांची नायकत नांवाच्या धर्मानें विशिष्ट अशी प्रतीति होते,” या लिहिण्याशीं तुमचा (म्ह० कुवलयानंदकारांचा) विरोध येतो; आणि अलंकारसर्वस्वाचे टीकाकार विमर्शिनीकार यांच्या, “अप्रकृतव्यहाराशीं अप्रकृतधर्मीचा (जारादिकांचा) नित्यसंबंध (म्ह० अविनाभाव) असल्यानें त्या अप्रकृत व्यवहारानें आक्षिप्त जो अप्रकृत धर्मीं, त्यानें प्रस्तुत धर्मी (चंद्रादि) अवच्छिन्न (म्ह० विशिष्ट) होतो.” या लिहिण्याशींही, तुमचा (कुवलयानंदाकारांचा) विरोध येतो. आतां तुम्ही :--- “चुंबन वगैरे अप्रकृत व्यवहारानें सूचित झालेला नायक (जारादिक) त्या अप्रकृत व्यवहाराचेंच विशेषण होतो; अभेदसंबंधानें चंद्र वगैरे प्रकृतधर्मीचें विशेषण होत नाहीं; कारण त्या जारादिक अप्रकृत धर्मीची उपस्थिति चंद्राशीं समानाधिकरण (म्ह० त्याच वाक्यांत येणार्या) अशा एखाद्या पदापासून होत नाहीं; कारण त्या जारादिक अप्रकृत धर्मीची उपस्थिति चंद्रशीं समानाधिकरण (म्ह० त्याच वाक्यांत येणार्या) अशा एखाद्या पदापासून होत नाहीं.” असें जें म्हटलें आहे, त्यावर आमचें म्हणणें असें कीं, वरील न्याय (विधान) निशा व नाशिकात्व या बाबतींतही लागू पडत असल्यानें, निशेवरही नायिकात्वाचा आरोप होतां कामा नये; त्या ठिकाणींही नायकाप्रमाणें सूचित होणारी नायिका ही अप्रकृतव्यवहाराचें विशेषण म्हणून राहते, असें तुम्ही म्हटलें पाहिजे; पण असें उमचें म्हणणें टिकणार नाहीं, (बाधित आहे) कारण, नायिकात्वानें स्पर्श न केलेला असा नुसता रात्रिमुखचुंबनरूप अप्रकृतव्यवहार, नायकाच्या संबंधानें विशिष्ट असा होऊच शकणार नाहीं. नायिकेचें रात्रीशीं तादात्म्य मानल्यावांचून नसतें मुखचुंबन नायकाला आपलें विशेषण करूच शकत नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP