समासोक्ति अलंकार - लक्षण ९
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां या समासोक्तीचे कांहीं प्रकार सांगतो. :---
विशेषणसाम्य (या अलंकारांत) श्लेषामुळें होतें किंवा शुद्ध साधारण्यामुळें होतें (असे दोन प्रकार.) आतां ते साम्य कार्यांहून निराळ्या धर्मानें (धर्म पुढें करून) होतें किंवा कार्यरूपी धर्माला पुढें करून होतें, असे पुन्हां प्रत्येकीं दोन प्रकर. पैकीं ‘विबोधयन्करस्पर्शै:’ या श्लोकांत कार्याहून निराळ्या धर्माला पुढें करून श्लेषानें होणार्या विशेषणसाम्याच्या समासोक्तीचें उदाहरण येऊन गेलेंच आहे, तरीपण याच प्रकारचे आणखी एक उदाहरण देतों :---
“हे गंगे ! तुझें अत्यंत मधुर असें पय [(१) पाणी (२) दूध] पीत पीत, सर्व श्रम नाहींसे झाले आहेत. असा मी खूप वेळ तुझ्या उत्संगावर [(१) पृष्ठभगावर (२) मांडीवर] केव्हा निजेन बरें ?”
ह्यांत लहान मूल व आई यांच्या व्यवहाराशीं अभेदसंबंधानें राहणारा प्रकृत व्यवहारा आहे.
आतां श्लिष्ट विशेषणसाम्यानें कार्यरूपी धर्म पुढें करून होणार्या समासोक्तीचें उदाहरण (सुरवातीलाच) ‘संगृण्हास्यलकां.’ या श्लोकांत (पूर्वीं ‘आबध्नास्यलकां’ या प्रारंभानें असलेल्या श्लोकांत) दिले आहे तें पहावें.
शुद्ध (श्लेषरहित शब्दांनीं होणार्या विशेषणसाम्यानें) व कार्याहून निराळ्या धर्मानें होणार्या समासोक्तीचें उदाहरण :---
“कानांत भूषणें घालतांना (पहिल्या वेळीं) नवीन वेदना अनुभवणार्या, व सूं करून तोंड बाजूला वळविणार्या ह्या सुंदरीच्या कमललोमल हाताच्या, अत्यंत थोर भाग्याचें सार असणार्या फटकार्याची गोडी चाखणार्या तुझा जन्म, हे (कानांतल्या) सुंदर भूषणा ! सर्वांनीं वाखाणण्याजोगा आहे.”
ह्या ठिकाणीं नववधूनें कष्टानें कानांत घातलेल्या अलंकाराचा वृत्तांत पहिल्यानेंच नववधूच्या ओंठाला दुखवणार्या प्रेमी रंगेलाच्या वृतांताशीं अभेदसंबंधानें राहिला आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP