आणखी असें कीं :---
“पश्चिमेकडे सूर्य गेला असतां, पूर्वदिशा शोभारहित झाली (फिक्की पडली). प्रियकर, सवतीवर प्रेम करूं लागला तर, कोण्या स्त्रीला आनंद वाटेल !” या श्लोकांतील पूर्वार्धांत असलेल्या समासोक्तींत, सूर्य (वगैरे) ची नायक (वगैरे) म्हणून प्रतीति होत नसेल तर, उत्तरार्धांत ‘प्रियकर, सवतीवर, ’ इत्यादिकानें पूवार्धांतील अर्थाचें समर्थन केलें आहे तें बिलकुल जुळणार नाहीं. शिवाय (आम्ही असें विचारतों कीं) अप्रकृत व्यवहार प्रकृत धर्मीवर आरोपित केला जातो तो, त्या प्रकृतधर्मीच्य व्यवहारासीं अलग राहून (म्ह० ताटास्थानें) केला जातो, कां (तो अप्रकृत व्यवहार) प्रकृत व्यवहाराशीम अभिन्न होऊन प्रकृत धर्मीवर आरोपित केला जातो ? पहिला पक्ष योग्य नाहीं; (म्ह० अप्रकृतव्यवहार प्रकृत व्यवहाराहून अलग राःऊन प्रकृत धर्मीवर आरोपित केला जातो असें मानणें योग्य नाहीं), कारण (तो योग्य मानला तर) एकाच प्रकृत धर्मीवर प्रकृत व्यहार व अप्रकृत व्यवहारा हे दोन एकत्र राहू लगतील; व एकाच धर्मीवर, एकाच वाक्यांत, दोन निरनिराळे धर्म प्रतीत होणें असा (एकत्र द्वयमित) विषयताशाली बोध होऊ लागेल. (म्ह० चंद्र वगैरे प्रकृत धर्मी, विशेष्य या रूपानें शाब्दबोधाल विषय होऊ लागेल, व त्यावरील दोन व्यवहार, प्रकार या रूपानें, शाब्दबोधाचे विषय होऊ लागतील; व ते तर जुळणार नाहीं हें वर सांगितलेंच आहे.) तुमचा दुसरा पक्षही योग्य नाहीं; कारण त्यापेक्षां प्रकृत व्यवहाराशी अप्रकृत व्यवहाराचा अभेदारोप (हा एक आरोप पत्करला) व त्या अप्रकृत व्यवहाराचा प्रकृतधर्मीवर विशेषण म्हणून भेदसंबंधानें आरोप, असें दोन आरोप (दुसरा पक्ष मानल्यास होणारे) मानावे लागतील; व त्यामुळें होणारा गौरवदोष पत्कारावा लागले. [प्रकृत व्यवहारावर अप्रकृत व्यवहाराचा अभेदसंबंधानें आरोप करणें बरें नव्हे; कारण दोन व्यवहारांचा प्रकार (प्रकृत धर्मीचे प्रकार) म्हणून अभेदारोप, व प्रकृत धर्मीशीं अप्रकृत व्यवहाराचा भेदसंबंधानें होणारा आरोप असे दोन आरोप स्वीकारण्याचा (तुमच्या दुसर्या पक्षांत) प्रसंग येतो.] पण माझ्या (म्ह० जगन्नाथाच्या) मतांत फक्त धर्मीच्या अभेदांशांतच आरोप मानला जातो. हा तुमच्या आमच्यांत स्पष्ट फरक. म्हणून (या सर्व विवेचनावरून) स्वविशेष्य म्ह० अप्रकृत व्यवहाराचें विशेष्य (जारादिक) प्रकृत व्यवहाराच्या विशेष्याशीं (चंद्रादिकाशीं) अभिन्नपणानें राहिलें म्हणजे मग, प्रकृत व्यवहारही अप्रकृत व्यवहाराशीं अभिन्नपणानें स्पष्ट प्रतीत होऊ लागेल व प्रकृतार्थाला अप्रकृतार्थ उपस्कारक असल्यानें तो अप्रकृतार्थ प्रकृतार्थाला गौण होऊन राहील, असें मानणें हा प्रकारच चांगला. आतां हा जो प्रकृतावर अप्रकृताचा आरोप होतो (स च) तो, ‘त्वत्पादनखरत्नानां,’ या वाक्यार्थरूपकांतल्याप्रमाणें, विशिष्टाचा विशिष्टावर आरोप अशा स्वरूपाचा नसतो; कारण समासोक्तींत, विशेषणविशिष्ट प्रकृत वाक्यार्थ व विशेषणविशिष्ट अप्रकृत वाक्यार्थ असे दोन वाक्यार्थ निराळ्या शब्दांनीं मुळींच सांगितलेले नसतात, (ते एकाच श्लिष्ट विशेशणांतून निघत असल्यानें, त्यांतील अप्रकृतार्थ पृथकशब्दोपात्त मानतांच येत नाहीं.) पण (समासोक्तींत) प्रकृतवाक्यार्थाचे घटक (उदा० चंद्र, ऐन्द्री, निशा, मुख, चुंबन वगैरे) पदार्थ तादात्म्यसंबंधानें, अप्रकृत घटक पदार्थांनीं विशिष्ट झाल्यानें, वैशिष्टयानें युक्त होऊन, शेवटीं एका महावाक्यार्थाच्या रूपानें राहतात असें, सूक्ष्मद्दष्टीनें (वाचकांनीं) पहावें. आतां अतिशयोक्तींत जसें अप्रकृतानें प्रकृताचें निगरण केलेलें असतें तसें, समासोक्तींत अप्रकृतानें प्रकृताचें निगरण केलेलें असतें, असेंही म्हणूं नये; कारण समासोक्तींत प्रकृतार्थ शब्दांनीं सांगितलेंला असतो. (व अतिशयोक्तींत प्रकृतार्थ अप्रकृतार्थानें निगीर्ण असतो.)