महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक १७ ते १९

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


स्पष्टशब्दादियुक्तेषु भौतिकत्वमतिस्फुटम् ॥
अक्षादावपितच्छास्त्रयुक्तिभ्यामवधार्यताम् ॥१७॥

शब्दादि युक्ती करून ॥ भौतीक स्पष्ट केलें जाण ॥
कोणतीहीवस्तु निर्माण ॥ भूत कार्यीं वसे ॥६४॥
घेउनी शास्त्राचें प्रमाण ॥ इंद्रियें कार्यासहित कथलीं जाण ॥
“अन्नमयंहि सौम्य मन” ॥ इत्यादि वाक्यें ॥६५॥
आदी मध्य अंती ॥ एकचि आत्मा निश्चिती ॥
हेही झाली स्पष्टोक्ती ॥ अन्वय व्यतिरेकें ॥६६॥
जैसे मृत्तिका कार्य घत होत ॥ आदी मध्य अंतीं माती असत ॥
तैसेंच हया भौक्तिकीं वसत ॥ आत्मतत्व ॥६७॥
“षोडशकला सौम्य पुरुष” इति ॥ बोलियली छांदोग्य श्रुति ॥
तीच केली स्पष्टोक्ती ॥ शास्त्रयुक्ति ॥६८॥

एकादशेंद्रियैर्युक्त्या शास्त्रेंणाप्यवगम्यते ॥
यावत्किंचिद्भवेदेतदिदं शब्दोदितंजगत् ॥१८॥

“सदैव सोम्येदमग्र आसीत” ॥ इत्यादि श्रुति सिद्धांत ॥
तेचि अद्वैत ब्रम्हा प्रतिपादित ॥ युक्ती केलें ॥६९॥
भूत भौतिक सृष्टी ॥ एकलाची करी परमेष्टी ॥
तयाची ही हातवटी ॥ दाखविली ॥७०॥
एकादश इंद्रियें कडुन ॥ किंवा शास्त्र युक्ती लढऊन ॥
हेंचि केलें प्रतिपादन ॥ अद्वैत ब्रम्हा ॥७१॥
इदं ही सकल जंगत ॥ ऐसे झाले प्रतिपादित ॥
तेंचि करावया पूरीत ॥ प्रमाण बोले ॥७२॥

इदं सर्वं पुरा सृष्टेरेकमेवाद्वितीयकम् ॥
सदेवासी न्नामरूपे नास्तामित्यारुणेर्वच: ॥१९॥

अरुण पुत्र उद्दालक ॥ ऐसेंच बोलिला सम्यक ॥
नामरूपादी भासक ॥ सद्ववस्तुति असे ॥७२॥
साखरेचें केलें वृंदावन ॥ तैं कायेतें कहवटपण ॥
नामरूप भासोनी भिन्न ॥ साखरची तें ॥७३॥
तैसेंची हें जगत ॥ नामरूपीं भिन्न दिसत ॥
परीअसे एक अद्वैत ॥ ब्रम्हा पूर्ण ॥७४॥
आदी मध्य अंतीं ॥ नगीं सुवर्णाचीच वस्ती ॥
तैसेंच ब्रम्हानिश्चिती ॥ सर्वत्र असे ॥७५॥
येथें झालें न झालें ॥ नाना तैसेंची संचलें ॥
है सकलही आर्वाक बोले ॥ म्रांतमयी ॥७६॥
वस्तुचॆं यथार्थ वर्णन ॥ वस्तुशींच न होय जाण ॥
तेथें अवस्तु प्रमाण ॥ कवणें घ्यावें ॥७७॥
तेंचि करावया कथन ॥ मुनी बोलियेले पुढें होऊन ॥
आम्हीही तयाची कासधरून ॥ सरसावलों ॥७८॥
शं० - हांहां तुमचे बोला ॥ जीव आमुचा भ्याला ॥
कांकीं एकही प्रमाणाला ॥ धरितां नये ॥७९॥
प्रथम अद्वैत बोलितां ॥ पुढें द्वैत प्रतिपादितां ॥
पुन्हां अद्वैतचि द्वैत झालें म्हणतां ॥  एवं सकल घोटाळा ॥८०॥
बरें पुढें कांहींच नाहीं झालें ॥ वस्तु जैसें तैसेचि संचलें ॥
हेंही प्रतिपादित केलें ॥ भ्नमिष्टा सारखें ॥८१॥
आतां आम्हीं ऐसें विचारूं ॥ वस्तुचि झालाना संसारु ॥
का नामरूपादि प्रकारु ॥ निराळा असें ॥८२॥
स० - कोणी ही बोलिल्या वत्त्क्याचा ॥ शेवट सिद्धांत घ्यावा त्याचा ॥
तैसा आमुचे बोलाचा ॥ शेवट घेई ॥८३॥
वस्तु स्वत: अभेद ॥ तेथें कधींच नाहीं झाले भेद ॥
हे सद्दष्टांत करुनि सिद्ध ॥ दाऊं तुजला ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP