महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ८१ ते ८५

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


सतोऽनुवृत्ति: सर्वत्र व्योम्रो नेति पुरेरितम् ॥
व्योमानुवृत्तिरधुना कथं न व्याहतं वच: ॥८१॥

वादी - व्योम विवेदन प्रस्तावें ॥ सन्नतुव्योमें बोलावें ॥
आणि तेंचि आतां विवरात्रें ॥ कोणे रीती ॥४००॥
आतां त्याचे विपरीत बोलता ॥ आकाशानुवृत्ति कथिता ॥
तरि ययास दोष कोण आतां ॥ घ्यावा आम्ही ॥४०१॥
सत अनुवृत्ती सर्वत्र असें ॥ तैशी आकाशीं मुळीच नसे ॥
हेंचि प्रतिपादन केलें असें ॥ पुर्वीं तुम्ही ॥४०२॥
आपणचि आपल्या बोला ॥ व्याघात करूं लागला ॥
मग सर्वचि घोंटाळा ॥ पुर्वापार ॥४०३॥

छिद्रानुवृत्तिर्नेतीति पूर्वोक्तिरधुना त्वियम् ॥
शद्बानुवृत्तिरेवोक्ता वचसो व्याहति: कुत: ॥८२॥

सि० - पुर्वीं स्वरूप लक्षणा बोलिली ॥ आतां शद्बानुवृत्ति प्रतिपादिली ॥
यांत व्याहतिदोषा जागा दिली ॥ कैशी तुवां ॥४०४॥
जैसें कां अग्निसन्निधानीं ॥ शीत होतसें उष्ण पाणी ॥
त्यांत अग्नी न येवोनी ॥ ऊष्णताचि येते ॥४०५॥
तैसी शब्दानुवृत्ति ॥ वायुतत्त्वीं राहती ॥
यांत दोष व्याहती ॥ कोठें येतो ॥४०६॥

ननु सद्वस्तु पार्थक्यादसत्त्वं चेत्तदा कथम् ॥
अव्यक्तमायावैषम्यादमायामयतापि नो ॥८३॥

वादी - वाय्वादिकांतुनी काढिता सत्ता ॥ ते जैसे राहती निस्तत्वता ॥
तैसी माया ही कां न म्हणतां ॥ निस्तत्व ऐशी ॥४०७॥

निस्तत्त्वरूपतैवात्र मायात्वस्थ प्रयोजिका ॥
साशक्तिकार्ययोस्तुल्या व्यक्ताव्यक्तत्वभेदिनो: ॥८४॥

सि० - मायेंतुनी काढितां सत्ता ॥ माया ही निस्तत्व म्हणता ॥
काय लाभे तुझे हाता ॥ सांग आम्हां ॥४०८॥
व्यक्ताव्यक्तत्व भेदा ॥ माया असे सदां सर्वदां ॥
करीतसे नाना धंदा ॥ मायीक पणें ॥४०९॥
मिस्तत्व हाचि स्वभाव मायेचा ॥ त्यांत लवलेशनसे सत्तेचा ॥
आम्हां विस्मय तुझ्या बोलाचा ॥ बहुवाटतो ॥४१०॥

सदसत्त्वविवेकस्य प्रस्तुतत्वात्स चिंत्यताम् ॥
असतोऽवांतरो भेद आस्तां तच्चिंतयात्र किम् ॥८५॥

असो आतां तुझें हें बोलणें ॥ आम्हां प्रस्तुत सदासत निवडणें ॥
असत आवांतर भैद गणणें ॥ नाहीं काज ॥४११॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP