महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ४८ ते ५०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


न सद्वस्तु स्वत: शक्तिर्न हि वन्हे:स्वशक्तिता ॥
सद्विलक्षणतायांतु शक्ते: किंतत्वमुच्यताम् ॥४८॥

वादी - वन्हिशक्ति वन्हिहूनी अभिन्न ॥ तैशीच सदशक्ती जाण ॥
किंवा तयाहूनी विलक्षण ॥ कांहीं असे ॥२२८॥
सदशक्ती सदची असे ॥ तरी शक्तिपणाचा अभाव दिसे ॥
नाहीं म्हणतां तरी विलसे ॥ असत पणे कैशी ॥२२९॥
स० - सद्शक्ती जी का माया ॥ ती असे जैसी पुरुषछाया ॥
तियेसी सत म्हणाया ॥ आम्ही पुढें नहोऊं ॥२३०॥

शून्यत्वमिति चेच्छून्यं मायाकार्यमितीरितम् ।
न शून्यं नापि सद्याद्दक्ताद्दक्तत्वमिहेष्यताम् ॥४९॥

मग शून्य जरी म्हणावें ॥ तरी कार्य कैसेनी व्हावें ॥
नामरूपादि अघवे ॥ कैसेनी राहती ॥२३१॥
म्हणोनी ती सत ना असत ॥ कांहीं म्हणतां नाहीं येत ॥
अनिर्वचनीय इत्यर्थ ॥ ठरला आमुचा ॥२३२॥

नासदासीन्नो सदासीत्तदानीं किंत्वभूत्तम: ।
सद्योगात्तप्रस: सत्वं न स्वतस्तन्निषेधनात् ॥५०॥

म्हणोनी सृष्टीच्या आधारा ॥ नाहीं सदासत थारा ॥
माय देवीचाची उभारा ॥ तमोमयी ॥२३३॥
“तमआमीत्तमसामूढमग्रे” इति ॥ प्रमाण बोलियेली श्रुति ॥
म्हणोनी सत्व निश्चिती ॥ सद्योगें ॥२३४॥
सद्वस्तुची शक्ती ॥ स्वत: निषेधा येती ॥
परि ती वस्तु पाशी असती ॥ सदत्वानें ॥२३५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP