महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ५४ ते ५७
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते
न कृत्स्नब्रम्हावृत्ति: सा शक्ति: किंत्वेकदेशभाक् ॥
घटशक्तिर्यथा भूमौ स्निग्धमृद्येव वर्तते ॥५४॥
सि० - ब्रम्हाशक्ति जी माया असे ॥ ती सर्वत्र कधींच न विलसे ॥
कांकीं ब्रम्हा अभाव होतसे ॥ सर्वत्र म्हणतां ॥२४७॥
बरें एकदेशी म्हणावें ॥ तरी निरंशा अंश कल्पावे ॥
म्हणोनी तेंही न संभवे ॥ आमुचे मते ॥२४८॥
जैशी कां घटशक्ति ॥ सर्वत्र मूभीमध्यें नसती ॥
स्निग्ध मृत्तिकेंतच असती ॥ एकदेशीं ॥२४९॥
तैशीच म्हणूं जावी माया ॥ एकदेशी ब्रम्हा या ॥
तरी स्वगत भेद ठाया ॥ पुसिला असे ॥२५०॥
‘सत्यंज्ञानमनंतंब्रम्हा’ इति ॥ बोलियली प्रमाण श्रुति ॥
तेणें देसकाळादि परिच्छेद स्थिती ॥ उरों नाहीं दिली ॥२५१॥
वादी - मग मुळींच माया नाहीं म्हणा ॥ उगाच कां वाढवितां कल्पना ॥
श्रुति स्मृतीच्या प्रमाणा ॥ दोष आला ॥२५२॥
पादोस्य सर्वा भूतानि त्रिपादस्ति स्वयंप्रभ: ॥
इत्येकदेशवृत्तित्वं मायाया वदति श्रुति: ॥५५॥
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥
इति कृष्णोऽर्जुनायाह जगतस्त्वेकदेशताम् ॥५६॥
स भूमिं विश्वतो वृत्त्वा हयत्यतिष्टद्दशांगुलम् ॥
विकारवर्तीचा भास्ति श्रुतिसूत्रकृतार्वच: ॥५७॥
एकपदीं सकल भुतें ॥ त्रिपाद स्वयंप्रभ राहते ॥
ऐशी श्रुतिही बोलते ॥ प्रमाण द्वारें ॥२५३॥
गीतेमाजी कृष्ण ही बोलिला ॥ अर्जुना एकांशेंन स्थिती जगताला ॥
सकल ब्रम्हागोल संचला ॥ माया एकदेशी ॥२५४॥
सूत्रकार ही हयाच रीती ॥ ते तिष्ठत दशांगुळ म्हणती ॥
विश्वविकारें विकार वर्ती ॥ मूमी एकदेशी ॥२५५॥
इत्यादि असंख्य श्रुति स्मृती ॥ प्रमाणें नाना रीती वदती ॥
ते कैसें निरंशें अंश आरोपिती ॥ सांगा आम्हां ॥२५६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 30, 2014
TOP