महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक २५ ते २७

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


विजातीयमसत्तत्त न खल्वस्तीति गम्यते ॥
नास्यात: प्रतियोगित्वं विजातीयाद्भिदा कुत: ॥२५॥

आतां विजातीय भेद असत ॥ तो मुळींच सिद्ध नाहीं होत ॥
असत शब्देंचि प्रतिपादित ॥ नाहीं ऐसें ॥९६॥
मुळींच जें झालें नाहीं ॥ तें प्रतियोगी होईल कैसें पाहीं ॥
तात्पर्य एकही भेद नाही ॥ वस्तुठाई ॥९७॥
स्वगत सजातीय विजातीय ॥ भेदरहित वस्तु होय ॥
म्हणोनी “एकमेवाद्वितीय” ॥ श्रुति बोलिली ॥९८॥

एकमेबाद्वितीयं सत्सिद्धमत्र तु केचन ॥
विव्हला असदेबेदं पुरासीदित्यवर्णयन् ॥२६॥

एवं ऐसें झालें सिद्ध ॥ वस्तु सदा सर्वदा अभेद ॥
परि मूर्ख तेथेंही विरुद्ध ॥ असतवाद करिती ॥९९॥
तयाचीया रीती ॥ दाउं तुजला पुढती ॥
“असदेवेदंपुरासीत्” इति ॥ विव्हालादि बोलती ॥१००॥

मग्नस्याब्धो यथाऽक्षाणि विव्हलानि तथास्य धी: ॥
अखण्डैकरसं श्रुत्वा नि:प्रचारा बिभेत्यत: ॥२७॥

मदिरापानें झाला उन्मत्त ॥ तो काय एक न बोलत ॥
तैसेंचि हें प्रतिपादित ॥ असत्य वादी ॥१०१॥
नाना डोळियां झाली कावळी ॥ मग तो कोणती वस्तु न म्हणे पिंवळी ॥
जें जें दिसे तया जवळी ॥ तें तें पीतची भासे ॥१०२॥
किंवा क्षारसमुद्रीं बुडाला ॥ मग जैसे धुरकट देखे वस्तूला ॥
तैसेचि या तया विव्हला ॥ बुद्धि झाली ॥१०३॥
एवं असत पूर्वीं होतें ॥ हें म्हणणें दिसे अरुतें ॥
आपणचि आपुल्या व्याघातें ॥ जिवें कैसा ॥१०४॥
वांझेचिया मुला ॥ कोण मातेचा सोहळा ॥
नाकोणडोंगरी मृगजला ॥ उगम झाला ॥१०५॥
विषेन कैसें जियावें ॥ असतचि कैसे हुवावें ॥
प्रेतें कैसें वदावें ॥ स्व मृत्युतें ॥१०६॥
अखंडैकरस वस्तु ॥ तेथें कैच्या इया मातु ॥
ऐकोनीया श्रुति सिद्धांतु ॥ भयें लपाली ॥१०७॥


References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP