महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ५१ ते ५३

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


अत एव द्वितीयत्वं शून्यवन्न हि गण्यते ॥
न लोके चैत्रतच्छत्त्क्योयों र्जीवितं लिख्यते पृथक् ॥५१॥

एवं ऐसें झालें सिद्ध आतां ॥ शून्यत्व शक्तिस नये म्हणातं ॥
जरि ती पृथक्कारें धुंडतां ॥ न सांपडे कधीं ॥२३६॥
आणि लोकीं ही याच रीती ॥ शक्ती पृथक्कारें न गणिती ॥
चैत्राचा पगार आर्पिती ॥ चैत्रासच ॥२३७॥
चैत्र आणि त्याची सक्ति ॥ हे पृथक्कपणें न लिखती ॥
पुरुषीच सामावती ॥ शक्ती तयाची ॥२३८॥

शत्त्क्याधिक्ये जीवितं चेद्वर्धते तत्र बुद्धिकृत् ॥
न शक्ति: किंतु तत्कार्यं युद्धकृष्णादिकं तथा ॥५२॥

शक्तिच्याचि मानें अर्पिती ॥ कमजास्त जीवित वृत्ती ॥
ऐसे नोहे बुद्धिकौशल्यें होती ॥ कमजास्त पणा ॥२३९॥
कृषीवळाची शक्ती ॥ युद्धकर्‍यापासून जास्त होती ॥
परि योद्धा वेतन मिलवीतो जास्ती ॥ येरा कमी ॥२४०॥
म्हणोनीयां शक्ती वरती ॥ नाहीं वेतन कमजास्ती ॥
शक्ती निराळी न गणती ॥ पुरुषमात्रीं ॥२४१॥
तैशीच ही मायाशक्ती ॥ सद्वस्तुवीण नये हातीं ॥
कांकीं पृथक्कपणे न वाफरती ॥ सद्वस्तुच्या ॥२४२॥
एवं हे ऐसें झालें ॥ शक्ती पृथक्कपण नाहीं आलें ॥
कार्या वरुनी ओळखिलें पाहिजे तिला ॥२४३॥

सर्वथा शक्तिमास्य न पृथग्गणना कचित् ॥
शक्तिकार्यं तु नैवास्ति द्वितीयं शंक्यते कथम् ॥५३॥

सर्वत्रची ऐसें असे ॥ शक्ति पृथक्क कोणी गणीत नसे ॥
म्हणोनी द्वितीयत्व नसे ॥ कोठे ही शक्तिचें ॥२४४॥
वस्तु आणि वस्तु शक्ती ॥ हीं भिन्नपणे कधीच नसती ॥
म्हणोनी शंकेची उत्पति ॥ नसे द्वैताच्या ॥२४५॥
वादी - सदशक्ति ही सर्वत्र असे ॥ किंवा एक देशीं वसे ॥
तयाचें प्रमाण कांहीं असे ॥ श्रुती मधें ॥२४६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP