महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ४५ ते ४७

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


सद्बुद्धिरपि चेन्नास्ति मास्त्वस्य स्वप्रभत्वत: ॥
निर्मनस्कत्वसाक्षित्वात्सन्मात्रं सुगमं नृणाम् ॥४५॥

वा० - बुद्धिग्राहक नाहीं म्हणतां ॥ स्वयंप्रम स्वभावतां ॥
मग त्याची अस्तित्वाची वार्ता ॥ कैसेनी कळे ॥२१०॥
स० - अरे बुध्यादिकांच्या नास्तित्वा ॥ जो साक्षी असे तत्वता ॥
तया निरमनस्का साक्षित्वा ॥ कवण हवें ॥२११॥
तूंची स्वत: आपण पाहीं ॥ तुझ्या अस्तित्वाची कोण करील ग्वाही ॥
बरें कोणी म्हणेना म्हणोनी नाहीं ॥ काय तुझा तूं ॥२१२॥
एवं सुगम सन्मात्रवस्तु ॥ जेथ मन बुद्धीची न चले मातु ॥
कोणाचे अस्तित्वावीण असतु ॥ अस्ति त्व जयाचें ॥२१३॥

मनोजृंभणराहित्ये यथा साक्षी निराकुल: ॥
मायाजृंभणत: पूर्वं सत्तथैव निराकुलम् ॥४६॥

ऐसे सुगम आणि सोपारे ॥ जेथ नसे मनकल्पनेचे वारे ॥
निराकुल साक्षित्व स्फुरे ॥ एकलेंची ॥२१४॥
तैसी मायातीत वस्तु ॥ माया आवरण रहितु ॥
माये पूर्वीं असतु ॥ निराकुल ॥२१५॥
वस्तु स्वातंत्र्य निरंतर ॥ तेथ कोणीही न करी अंतर ॥
उगा मायेचें औडंबर ॥ दिसों येतें ॥२१६॥
माया म्हणजे कांहीं नाहीं ॥ ते वस्तुशीं करील काई ॥
मृगजळाचे प्रवाहीं ॥ सूर्य़ बुडे कैसा ॥२१७॥
मृगजळ होण्या पूर्वीं होती ॥ निराकुल सूर्याची स्थिती ॥
मग ते झाले वरती ॥ व्याकुळली काई ॥२१८॥
हें जैसें का व्यर्थ बोलणें ॥ तैसीं मायेचीं असती लक्षणें ॥
वस्तु कांहींच हें नेणे ॥ सदेंवपणे ॥२१९॥

निस्तत्वाकार्यगम्यास्य शक्तिर्मायाग्रिशक्तिवत् ॥
नहि शक्ति:क्वचित्कैश्चिद्बुध्यते कार्यत: पुरा ॥४७॥

मायेचें मुळींच अस्तित्व नसे ॥ उगीच स्वरूपावरी आभासे ॥
जैसें कां मृगजळ दिसे ॥ सूर्य किरणीं ॥२२०॥
परि अज्ञकुरंगें तृषिती ॥ पाणी म्हणोनी धांव घेती ॥
तयांची किती वर्णावी फजिती ॥ श्रमले पणे ॥२२१॥
तैसें या मायाजाळीं ॥ सावजें बहु सांपडलीं ॥
काळ येवोनीयां बळी ॥ माना कुरुंडी ॥२२२॥
“नान्यत् किंचन मिषत्” ॥ ऐसा श्रुतीचा सिद्धांत ॥
परि तो मूर्खा न मानवत भ्रमले पणें ॥२२३॥
तयांचा भ्रमनिरसायासाठीं ॥ श्रुति कळवळोनि पोटी ॥
अध्यारोप अपवाद राहटी ॥ बोलूं लागली ॥२२४॥
वस्तुशक्तीच माया असे ॥ परि ती कार्यानुमेय दिसे ॥
येर्‍हवीं कधींच न भासे ॥ स्वतंत्र पणे ॥२२५॥
जैशी कां अग्रिशक्ति ॥ स्फोटादी ज्वलन कार्यें वाटती ॥
तैशीच ही मायाशक्ती ॥ भूतादि कार्यें गमे ॥२२६॥
येर्‍हवीं तरी शक्ति ॥ स्वतंत्रपणें कै भासती ॥
कार्यानुमेयंच दिसती ॥ सर्वत्र ठाईं ॥२२७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP